भंडारात रोहयो कामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:28+5:30
मजुरांना फळबाग लागवड योजनेअंतर्गत तसेच रोहयोच्या विविध कामांतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गावातच काम उपलब्ध होत असल्याने मजुरात समाधान व्यक्त होत आहे. पहेला मंडळ कार्यालयांतर्गत असणाऱ्या निमगाव येथे रोहयो कामांतर्गत मजुरांना कृषी सहायक एस. एच. केदार यांनी कोरोना बाबत जनजागृती केली.

भंडारात रोहयो कामांना सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढल्याने ग्रामीण भागात मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी भंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुक्यांतर्गत विविध ठिकाणी रोहयो कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
तालुक्यातील खराडी, चिखली, मांडवी, खमारी, सोनुली, मोहदुरा, माटोरा, हत्तीडोई, खुर्शीपार, आमगाव, राजेगाव, गुंथारा, धारगाव, राजेदहेगाव, डोडमाझरी, निमगाव आदी गावात रोहयो कामांना सुरुवात झाली आहे. यावेळी मजुरांना फळबाग लागवड योजनेअंतर्गत तसेच रोहयोच्या विविध कामांतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गावातच काम उपलब्ध होत असल्याने मजुरात समाधान व्यक्त होत आहे. पहेला मंडळ कार्यालयांतर्गत असणाऱ्या निमगाव येथे रोहयो कामांतर्गत मजुरांना कृषी सहायक एस. एच. केदार यांनी कोरोना बाबत जनजागृती केली.
भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात विविध गावात कामे सुरु आहेत. शेतकऱ्यांना उन्नत शेती, समृध्द शेतकरी योजनेंतर्गत गावनिहाय मार्गदर्शन करण्यात येत असून कृषी यांत्रीकीकरण योजनेची मुदत १५ मे असल्याने शेतकºयांना आवाहन करण्यात येत आहे. खरीप हंगामासाठी तालुक्यातील कृषी सहाय्यकांमार्फत रोहयो कामासोबतच शेतकरी, शेतमजुरांना बदललेली पीकपद्धती व बीजप्रक्रियेची प्रात्याक्षिके दाखविण्यात येत आहेत.