अवैध रेती वाहतूक जोमात रस्ते झाले जर्जर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:14+5:302021-03-28T04:33:14+5:30
शहरात दोन चार रेतीचे ट्रॅक्टर धावताना दिसायचे, परंतु आता रेती चोरांच्या मनातील भीती नाहीशी झाली की काय, असे वाटू ...

अवैध रेती वाहतूक जोमात रस्ते झाले जर्जर
शहरात दोन चार रेतीचे ट्रॅक्टर धावताना दिसायचे, परंतु आता रेती चोरांच्या मनातील भीती नाहीशी झाली की काय, असे वाटू लागले. सकाळी ११ वाजतापासून ते रात्री ९ वाजता पर्यंत रेतीचे ४ ते ५ टिप्पर व २० ते २५ ट्रॅक्टर कुशारी फाटा ते इंदिरा गांधी चौकातून तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या समोरून शहरात व आंधळगाव कडे बिनबोभाट पणे जातात. इतक्या प्रमाणात रेती वाहतूक होत असताना सुद्धा दोन्ही विभागाकडून कारवाई केली जात नाही. मात्र दिवसभर इतक्या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या या वाहनांमुळे मोहाडी शहराच्या आतील रस्ते पूर्ण खराब झालेले आहे. ज्यांना नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेतीची अवैध वाहतूक त्वरित बंद करून भयमुक्त करावे अशी मागणी आहे.