रस्ता दुरुस्तीची कामे ठरली भ्रष्टाचाराचे कुरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:47 IST2018-10-30T22:47:17+5:302018-10-30T22:47:39+5:30
लाखांदूर तालुक्यात बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था व गुणवत्ता लक्षात घेता या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचे लक्षात येत आहे. खडीकरण, पॅचेस, डांबरीकरणाच्या नावाखाली निधीची विल्हेवाट लावली जात असून रस्ता दुरुस्ती म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. अधिकारी अभियंता, कंत्राटदार, लोकप्रतिनिधी यांच्या टक्केवारीत मोठा वाटा असल्याचे बोलले जात असून या कामाची चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे

रस्ता दुरुस्तीची कामे ठरली भ्रष्टाचाराचे कुरण
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : लाखांदूर तालुक्यात बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था व गुणवत्ता लक्षात घेता या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचे लक्षात येत आहे. खडीकरण, पॅचेस, डांबरीकरणाच्या नावाखाली निधीची विल्हेवाट लावली जात असून रस्ता दुरुस्ती म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. अधिकारी अभियंता, कंत्राटदार, लोकप्रतिनिधी यांच्या टक्केवारीत मोठा वाटा असल्याचे बोलले जात असून या कामाची चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शहरी व ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा पूर्णत्वास नेण्यासाठी रस्ता दुरुस्ती बांधकामाला शासनामार्फत महत्व देऊन अग्रस्थान दिले आहे. त्याकरिता विविध योजनांची आखणी व निर्मिती करून वेगवेगळ्या विभागामार्फत करोडो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. जाहिरातीच्या माध्यमातून मोठा गाजावाजा सुद्धा केला जात आहे. मात्र शेळीच कुंपण खात असल्याचे दृष्य निदर्शनास येत आहे. तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाºया रस्त्यांची दूरावस्था आणि कामाची गुणवत्ता खालावली असून परिपत्रकानुसार काम न करता थातुरमातूर कामे करून निधीची विल्हेवाट लावल् या जात असल्यामुळे मुदतीच्या आतच रस्ते उखडून रहदारी योग्य राहात नाही.
लाखांदूर तालुक्यात रस्त्यावर वर्षभर कामे केली जात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला रोजच यंत्राचे दर्शन घडत असते. रस्त्यावरील खड्ड्यात कधी माती तर कधी भिसी, कधी चुरी तर कधी मुरुमाची झालर दिसून येत असून पॅचेसच्या माध्यमातून डांबर पोतून अर्धे खड्डे रिकामे तर काही पूर्ण केले जातात. नंतर पुन्हा कामाच्या नावात फेरबदल करून डांबरींग रस्ता, रुंदीकरणाची कामे केली जातात. याचे गणित मांडणे कठीणच आहे.
आजच्या घडीला तालुक्यातील एका रस्त्यावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असून सुरुवातीला खड्ड्यात गिट्टी टाकून त्यावर मुरुमाचा मुलामा देण्यात आला. त्यानंतर दोन दिवसात तो रस्ता उखडला. आता त्यावर पॅचेस बुजविण्याच्या नावाखाली डांबरीकरणाची मलमपट्टी केली जात आहे.
तो रस्ता किती दिवस टिकेल हे न सांगणेच बरे. त्याच रस्त्याची आता नव्याने ई टेंडरिंग निघाल्याचे कळते. त्यावरून बांधकाम विभागाचा कारभार कसा आहे हे दिसून येत आहे. बºयाच ठिकाणी परिपत्रकानुसार काम न करता फलक लावले जाते तर काही ठिकाणी फलकच दिसून येत नाही.
तालुक्यातील बºयाच रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे की मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते म्हणण्याची वेळ आली आहे. जनतेला प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही रस्ते तर अपघाताचे रस्ते बनले आहेत. रस्त्याची दूरावस्था ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली असून दैनंदिन प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे.
शासकीय परिपत्रक व निर्देशाला केराची टोपली दाखवून अनेक योजना रस्ता दुरुस्ती बांधकाम कागदावरच दाखवून रस्त्यावर थातूरमातूर कामे केली जातात. शासकीय निधीची विल्हेवाट लावून आर्थिक लूट करून विकास कामाच्या नावावर जनतेला धोका देत अधिकारी, अभियंता, कंत्राटदार, लोकप्रतिनिधी संगनमताने टक्केवारीनुसार सेटींग करून धन्यता मानत असल्याचे नाकारता येत नाही. असे मत अनेक सुजाण नागरिकांनी मांडले असून कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गिट्टी टाकून त्यावर मुरुमाचा मुलामा देण्यात आला. त्यानंतर दोन दिवसात तो रस्ता उखडला. आता त्यावर पॅचेस बुझविण्याच्या नावाखाली डांबरीकरणाची मलमपट्टी केली जात आहे. तो रस्ता किती दिवस टिकेल हे न सांगणेच बरे. त्याच रस्त्याची आता नव्याने ई टेंडरिंग निघल्याचे कळते. यावरून बांधकाम विभागाचा कारभार कसा आहे हे दिसून येत आहे. बºयाच ठिकाणी परिपत्रकानुसार काम न करता फलक लावले जाते तर काही ठिकाणी फलकच दिसून येत नाही.
तालुक्यातील बºयाच रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे की, मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते म्हणण्याची वेळ आली आहे. जनतेला प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही रस्ते तर अपघाताचे रस्ते बनले आहेत. रस्त्याची दूरावस्था ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली असून दैनंदिन प्रवासात कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
शासकीय परिपत्रक व निर्देशाला केराची टोपली दाखवून अनेक योजना रस्ता दुरुस्ती बांधकाम कागदावरच दाखवून रस्त्यावर थातूर मातूर कामे केली जातात. शासकीय निधीची विल्हेवाट लावून आर्थिक लूट करून विकास कामांच्या नावाखाली जनतेला धोका देत अधिकारी अभियंता, कंत्राटदार, लोकप्रतिनिधी संगनमताने टक्केवारीनुसार सेटींग करून धन्यता मानत असल्याचे नाकारता येत नाही. असे मत अनेक सुजाण नागरिकांनी मांडले असून कामांची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.