समृद्धीनगरातील रस्त्याची दुरवस्था

By Admin | Updated: June 28, 2014 01:01 IST2014-06-28T01:01:07+5:302014-06-28T01:01:07+5:30

शहरातील प्रभाग क्र. ५ अंतर्गत येणारा तकीया वॉर्ड, हनुमान नगर ते समृद्धीनगर, म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे.

Road to the prosperous land | समृद्धीनगरातील रस्त्याची दुरवस्था

समृद्धीनगरातील रस्त्याची दुरवस्था

भंडारा : शहरातील प्रभाग क्र. ५ अंतर्गत येणारा तकीया वॉर्ड, हनुमान नगर ते समृद्धीनगर, म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. १९९४-९५ नंतर कोणत्याही प्रकारचे रस्ता दुरुस्तीचे काम झालेले नाही.
सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. रात्रीचे वेळी पायी चालणे कठीण झालेले आहे. पटेल सॉ मिल ते हनुमान नगरपर्यंत पथदिवे बंद राहतात. नेहमी अंधार असतो. त्यामुळे वॉर्डातील रात्रीला या रस्त्याने घातपाताची शक्यता आहे. एखाद्यावेळी समाजकंटक, गुंड प्रवृत्तीचे लोकांकडून सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे.
वॉर्डात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. याबाबत प्रभाग क्र. ५ मधील नगर सेवक यांचेशी भेटून त्यांना रस्त्याची दुर्दशा बाबत अवगत केले. मात्र त्याचा फायदा काहीही झालेला नाही.
जिल्हा परिषद अंतर्गत दिवाण सभागृहाच्या मागे पूर्णत: उखडलेला आहे. सध्या पावसाळा सुरु झाला असून दोन्ही रस्ते वेळेत दुरुस्त न केल्यास अपघात होऊन जीवीत हानी होण्याची शक्यता आहे.
सन १९९५ नंतर अस्तित्वात आलेले भंडारा शहरातील इतर कॉलोनीमधील रस्त्यांचे बांधकाम पक्के होवून प्रभाग क्र. ५ मधील रस्ते दुरुस्ती करण्यात आलेले नाही. यापूर्वी माजी अवजड केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी वॉर्डात सभा घेऊन सभेत कॉलनीतील रस्ते बनविण्याचे आश्वासन दिलेले होते. परंतु रस्त्याचे काम झालेले नाही.
सदर कॉलनीला भेट देवून रस्त्याची पाहणी करून पुढील कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रभाग कय. ५ मधील नागरिकांनी केली आहे. दि. १ जुलैपर्यंत मागण्यांवर काहीही तोडगा न निघाल्यास नाईलाजास्तव कोणतीही पूर्व सूचना न देता कधीही कॉलोनीवासीयांना मोर्चे, धरणे आंदोलन करण्यात येईल. आगामी विधानसभा निवडणुकीवर, घर टॅक्स, नळाच्या बिलावर बहिष्कार टाकणे बाबत निर्णय घ्यावे लागेल. यामुळे होणारे परिणामास शासन, प्रशासन जबाबदार राहील. असा गंभीर इशारा प्रभागातील नागरिकांनी संबंधितांनाा दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शिष्टमंडळात चेतन चेटुले, पिंटू तिजारे, सतीष हजारे, कमलेश बाभरे, आशिष खंडाते, तुषार बांते, नितीन झलकरिया, निलेश बाभरे, प्रशांत कुकडे, मुलचंद खराबे, नरेंद्र रामटेके, टेंभुर्णे, रामटेके, उरकुडे, कावळे, मुन्ना तिवारी, फेंडर, विश्वनाथ हलमारे, सुखदेव सार्वे, दादाराम निंबार्ते, सुरेश रेहपाडे, घनश्याम गोमासे, खंडाते, हेडाऊ, जगदिश हजारे, घुमरे आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Road to the prosperous land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.