शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

तांदळाचे भाव गडगडले गिरणी मालक अडचणीत

By admin | Updated: January 7, 2016 00:59 IST

खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात धानाचे उत्पादन झाले. तरी भाव गडगडत आहेत.

कोंढा (कोसरा) : खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात धानाचे उत्पादन झाले. तरी भाव गडगडत आहेत. याला केंद्र व राज्य शासनाचे धोरण कारणीभूत आहे. अशी धान उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता तयार झाली आहे. धानाला योग्य भाव नसल्याने अनेक राईस मिलमध्ये भात भरडण्याकडे शेतकरी डोळेझाक करीत आहे. यामुळे गिरणीमालक देखील संकटात सापडले आहे.पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. सतत तीन वर्षापासून दुष्काळ, अतिवृष्टी किडीचा प्रादुर्भाव अशा संकटात सापडत आहे. त्यामुळे धानाचे उत्पादनात घट होत आहे. यावर्षी तर एकरी १० ते १५ पोते धान झाले. धानाला योग्य भाव नाही. अनके गिरणीमालक धान खरेदी करतात व धानाचे मिलिंग करून तांदूळ बनवून मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. काही व्यापारी धानाची खरेदी करून मिलिंग करून तांदूळ बनवून विकत असतात. ठोकळ प्रतीचे धान आधारभूत केंद्रावर विकतात. पण बारीक पोते असलेले धान सध्या २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल व्यापारी घेत आहेत. त्याचे तांदूळ बनवितात. पण तांदळाला उठाव नसल्याने तांदूळ गिरणीमध्ये तुंबून आहे. भाव कमी असल्याने शेतकरी धान घरी भरून ठेवतात. तर काही शेतकरी गिरणीच्या बाहेर धानाच्या पोत्याच्या थप्प्या लावून ठेवत आहेत. भंडारा जिल्ह्यात पवनी, भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखांदूर तालुक्यात धानाचे उत्पादन भरमसाठ आहे. (वार्ताहर)