राईस मिलच्या अध्यक्षांवर अविश्वासाची टांगती तलवार

By Admin | Updated: December 11, 2015 01:10 IST2015-12-11T01:10:45+5:302015-12-11T01:10:45+5:30

सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कारभार चालवून जिल्हा उद्योग संघ भंडारा येथे स्वत:चेच नाव प्रतिनिधी म्हणून पाठविले ...

Rice Mill chairman hangs in confidence | राईस मिलच्या अध्यक्षांवर अविश्वासाची टांगती तलवार

राईस मिलच्या अध्यक्षांवर अविश्वासाची टांगती तलवार

नाकाडोंगरीतील प्रकार : मतदान होणार
तुमसर : सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कारभार चालवून जिल्हा उद्योग संघ भंडारा येथे स्वत:चेच नाव प्रतिनिधी म्हणून पाठविले असल्याचे लक्षात येताच तेथील सात सदस्यांनी अध्यक्षांवर अविश्वास दर्शवून जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केल्याची अविश्वासाची टांगती तलवार लटकली आहे.
तुमसर तालुक्याततील दि नाकाडोंगरी को. आॅपरेटिव्ह राईस मिल सोसायटी नाकाडोंगरी या सहकारी संस्थेवर विद्यमान अध्यक्ष म्हणून खुशाल नारायण पुष्पतोडे हे आहेत. तर एकूण ९ सदस्य या सोसायटीवर निवडून आले असतांनी अध्यक्ष हे कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीनेच कारभार चालवू पाहत असतानी संस्थेने दि. २९ एप्रिल २०१२ च्या मासिक सभेत जिल्हा उद्योग संघाचे प्रतिनिधी म्हणून बाळकृष्ण मनीराम गाढवे रा.सीतासावंगी यांचे नाव पाठविण्यात यावे. या बाबत ठराव घेण्यात आला होता. परंतु अध्यक्ष खुशाल पुष्पतोडे यांनी मोठ्या शिताफिने विषय सूची नोटीसवर न घेता अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयामध्ये दि. १९ जुलै २०१५ च्या मासिक सभेच्या ठरावात स्वत:चेच नाव जिल्हा उद्योग संघाकडे पाठविले. ही बाब लक्षात येताच सोसायटीचे इतर सदस्य बाळकृष्ण गाढवे, उमाशांकर परबते, किशोर गौपाले, भूवंता सोनवाने, हेमराज सिरसाम, ईश्वरदयाल गौपाले व रतीराम खुणे या सातही सदस्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली आहे.
त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १०६० चे कलम ७३ - १ (३) व त्याखालील नियम १९६१ चे कलम ५७ - अ नुसार दि. १८ डिसेंबर २०१५ रोजी दि नाकाडोंगरी सहकारी राईस मिल सोसायटी नाकाडोंगरी येथे जिल्हा उपनिबंधकाने विशेष सभा बोलावली असून अविश्वास करिता मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Rice Mill chairman hangs in confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.