पालकमंत्र्यांनी घेतला विकासकामांचा आढावा

By Admin | Updated: June 25, 2017 00:19 IST2017-06-25T00:19:18+5:302017-06-25T00:19:18+5:30

जिल्ह्यातील विविध विकासकामांचा बैठकीत पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला.

Review of development works taken by Guardian Minister | पालकमंत्र्यांनी घेतला विकासकामांचा आढावा

पालकमंत्र्यांनी घेतला विकासकामांचा आढावा

जलयुक्त शिवार योजनेला प्राधान्य द्या : विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील विविध विकासकामांचा बैठकीत पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत डॉ. सांवत यांनी विविध विकास कामांचा आढावा घेत जलयुक्त शिवार अभियानाबाबत प्राधान्यक्रम देण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक विजय बागडे उपस्थित होते.
यावेळी सादरीकरणाद्वारे जिल्हा वार्षिक योजनेचा प्रगती आढावा घेण्यात आला. सर्वाधिक निधी कृषि संलग्न कामावर खर्च करण्यात आला. त्यानंतर शिक्षणावर खर्च करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. २०१६-१७ या आर्थिक वर्षात दिलेला निधी १०० टक्के खर्च झाल्याचे सांगितले.
नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत सामाजिक न्याय भवनात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली असून अद्यायावत असे केंद्र बनविण्यात आले. यामध्ये युपीएसी, एमपीएससह बँकीग सेवेबाबत प्रशिक्षण देण्यात येत असून यावर्षी १५० विद्यार्थी प्रशिक्षण घेत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५९ गावापैकी ३० गावे वॉटर न्युट्रल झाली असून या सर्व कामांवर १२ कोटी ९८ लक्ष इतका खर्च झालेला असल्याचे सांगण्यात आले. जलयुक्त शिवारची काम शास्त्रोक्त व लोकसहभागातून करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी ८ वाजेनंतर वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक विनीता साहु यांनी सांगितले. पवनी तालुक्यातील अवैध रेती वाहतुकीबाबत आमदार अवसरे यांनी प्रश्न उपस्थित केला त्याबाबत वैनगंगा नदीचे घाट दोन बाजूस आहेत. त्याचा फायदा घेऊन रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन रेती चोरीवर आळा घालण्यात येईल व त्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सेवा हमी कायद्यानुसार एका प्लॉटफॉर्मवर सर्व सेवा पुरविण्यात येणार आहेत. त्या सेतू केंद्रामार्फत पुरविण्यात येतील, असेही ते म्हणाले.
यावेळी महसूल, आरोग्य, कृषि, शिक्षण, वन विभाग,नाविण्यपूर्ण योजना, अवैध वाहतुक, तसेच नियोजन विभागाची नियोजित इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नियोजन विभागाच्या नियोजित इमारत, पोलीस मुख्यालय, जिल्हाधिकारी परिसराची पाहणी पालकमंत्रयांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पोलीस अधिक्षक विनीता साहू व अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Review of development works taken by Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.