महसूल मंडळनिहाय पिकांचे फेर सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:34 IST2018-11-04T21:34:26+5:302018-11-04T21:34:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात धानपिक उध्वस्त झाला. शेतकरी देशोधडीला लागले. मात्र शासनाने घोषित केलेल्या दुष्काळाच्या यादीत ...

Revenue Revenue Circle Round Survey | महसूल मंडळनिहाय पिकांचे फेर सर्वेक्षण

महसूल मंडळनिहाय पिकांचे फेर सर्वेक्षण

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात धानपिक उध्वस्त झाला. शेतकरी देशोधडीला लागले. मात्र शासनाने घोषित केलेल्या दुष्काळाच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड रोश निर्माण झाला आहे. आता महसूल मंडळनिहाय पीक पाहणी करून फेरसर्व्हेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाश्वभूमीवर शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बावनकुळे यांनी लोकप्रतीनिधीवर प्रशासकीय अधिकाऱ्याशी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा महसूल मंडळनिहाय फेरसर्व्हेक्षण करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला आमदार चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, बाळा काशीवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, महसूल उपजिल्हाधिकारी सुहास चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सर्व आमदारांनी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आग्रही मागणी लावून धरली. दुष्काळातून सुटलेल्या तालुक्यांसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीसमोर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त व गरजु एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. नुकसानग्रस्त महसूल मंडळात ग्रामपंचायतीमध्ये पीक पाहणीचा अंदाज घेण्यासाठी पीक कापणीचे अतिरिक्त चार प्रयोग करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिली.
दुष्काळात सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. जास्तीत जास्त शेतकºयांना मदत मिळेल याची काळजी घ्यावी. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पालकमंत्री म्हणून शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळून देण्यात येईल. अजुनही वेळ गेली नाही. शेतकºयांनी काळजी करू नये, असे आश्वासन त्यांनी दिले.
पीक कापणी प्रयोगाला पालकमंत्री उपस्थित राहणार
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन निश्चितच मदत करणार, अशी ग्वाही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले ज्या महसूल मंडळात अधिक नुकसान झाले, अशा सर्व मंडळातील गावात पीक कापणीचे अतिरिक्त प्रयोग घेवून फेर सर्व्हेक्षण करण्यात यावा. यावेळी आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोबत घ्यावे. त्यांच्या सहमतीने अहवाल तयार करावा, पीक कापणी प्रयोगाला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Revenue Revenue Circle Round Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.