पवनी तालुक्यात राजस्व अभियान ठरले नावापुरते
By Admin | Updated: August 16, 2014 23:18 IST2014-08-16T23:18:50+5:302014-08-16T23:18:50+5:30
पवनी तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे दोन महिन्यापासून महसूल अधिकाऱ्यांची सही न झाल्याने भंडारा येथे पडून आहेत. तसेच वर्ग दोनचे प्रकरण अनेक महिन्यापासून निकाली न निघाल्याने

पवनी तालुक्यात राजस्व अभियान ठरले नावापुरते
पवनी : पवनी तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे दोन महिन्यापासून महसूल अधिकाऱ्यांची सही न झाल्याने भंडारा येथे पडून आहेत. तसेच वर्ग दोनचे प्रकरण अनेक महिन्यापासून निकाली न निघाल्याने सुवर्ण जयंती राजस्व अभियानाबद्दल पवनी तालुक्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियान भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आले. यामध्ये शाळा महाविद्यालयात प्रमाणपत्रे वाटप, फेरफार, वर्ग २ चे वर्ग १ प्रकरण निकाली काढणे असे अनेक कार्यक्रम आहेत. पण सध्या पवनी तालुक्यातील शेकडो वर्ग २ चे वर्ग १ साठी प्रकरण भंडारा येथे पडून आहेत. तसेच जातीचे, नॉन क्रिमिलीयर, अधिवास असे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी पवनी तहसील कार्यालयामध्ये प्रमाणपत्र बनविण्यासाठी दिले आहेत. ते प्रकरण भंडारा येथे पाठविण्यात आले आहेत. पण त्या प्रमाणपत्रावर दोन महिन्यापासून सह्या झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतात. वर्ग दोनचे प्रकरण वर्ग १ करण्यासाठी शेतकऱ्यांनी बंदोबस्त मिसल, हिस्सा फार्म, नवीन जुना सातबारा असे सर्व कागदपत्रे देऊन अनेक प्रकरणे तहसील कार्यालय पवनी येथे तलाठ्यामार्फत दिली. पण वर्ग दोनचे वर्ग एक प्रकरण अनेक महिन्यापासून मंजूर झाले नाही.
राजस्व अभियानात देखील शेतकऱ्यांनी अनेक वर्ग १ चे प्रकरण तलाठ्याकडे दिली पण ती अजूनपर्यंत निकाली निघाले नाही. राजस्व अभियान महसूल प्रशासन गतीमान सुलभ व लोकाभिमुख होण्यासाठी की लोकांना त्रास देण्यासाठी आहे असा प्रश्न अनेक शेतकरी विचारीत आहेत. फेरफार प्रकरणे देखील लवकर निकाली लागत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तरी महसूल विभागाने गतीमान, सुलभ होण्यासाठी प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याची मागणी जनतेने केली आहे. (प्रतिनिधी)