गौण खनिजातून १४.५ लाखांचा महसूल

By Admin | Updated: January 15, 2015 22:46 IST2015-01-15T22:46:21+5:302015-01-15T22:46:21+5:30

तालुक्यात सहा रेतीघाट असून या रेतीघाटामधून रेतीची अवैधरित् या वाहतूक केली जाते. यावर तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी कारवाई करून एका वर्षात १४ लक्ष, ५२ हजार ७० रुपये

Revenue of 14.5 lakhs from minor minerals | गौण खनिजातून १४.५ लाखांचा महसूल

गौण खनिजातून १४.५ लाखांचा महसूल

साकोली : तालुक्यात सहा रेतीघाट असून या रेतीघाटामधून रेतीची अवैधरित् या वाहतूक केली जाते. यावर तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी कारवाई करून एका वर्षात १४ लक्ष, ५२ हजार ७० रुपये महसूल गोळा केला. यात मुरुम व गिट्टीचाही समावेश आहे. महसूल विभाग कारवाई करीत असला तरी साकोली तालुक्यातील रेती गोंदिया जिल्ह्यात नेली जाते.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर १४ पर्यंत महसूल विभागाने अवैध रेती, मुरुम व गिट्टीचे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करीत महसूल गोळा केला. तरीही दररोज साकोली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध उत्खनन केल्या जाते. यात शासनाला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याकडेही महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
मुरुम, रेती आणि दगडाच्या उत्खननासाठी रॉयल्टी काढली जाते. मात्र यातही परवानगीपेक्षा अधिक उत्खनन केले जाते. याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Revenue of 14.5 lakhs from minor minerals