शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:10 IST2018-02-28T22:10:37+5:302018-02-28T22:10:37+5:30
भेल प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना नोकरीची हमी देण्यात आली होती.

शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा
आॅनलाईन लोकमत
भंडारा : भेल प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना नोकरीची हमी देण्यात आली होती. मात्र, भेल प्रकल्प सुरू झाला नसून शेतकऱ्यांना शेतीपासूनही वंचित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती परत कराव्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भूसंपादीत शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
भेल प्रकल्प ठराविक काळात पूर्ण न झाल्यामुळे अनेक आयटीआय, बीई, पदवीधर, तांत्रिक पदवी घेणारे सुशिक्षित बेरोजगार मानसिक दृष्ट्या खचून गेल्या आहेत. रोजगार उपलब्ध नसल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. भूसंपादित शेतकरी व शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुरावर प्रकल्प सुरु न झाल्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. भेल प्रकल्पाला १३ मे ला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून १५ दिवसात भेल प्रकल्पाचे काम सुरु करण्याबाबत निर्णय न झाल्यास भेल प्रकल्पासमोर भूसंपादीत शेतकरी, बेरोजगार व परिसरातील सामाजिक संघटना व भेल बचाव संघर्ष समिती एकत्र येवून रास्ता रोको, भूसंपादित शेतकरी आत्मदहन, सुशिक्षित बेरोजगार सर्व एकत्र येवून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.