शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

बघेडा जलाशयात पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: September 23, 2016 00:38 IST

तुमसर तालुक्यातील बघेड़ा जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे जलाशय अंतर्गत येणारे गावे बघेड़ा,

समस्या दहा गावातील : पीक करपण्याची शक्यता, बावनथडीचे पाणी बघेड़ा जलाशयात सोडण्याची मागणीतुलसीदास रावते पवनारातुमसर तालुक्यातील बघेड़ा जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे जलाशय अंतर्गत येणारे गावे बघेड़ा, चिचोली, पवनारा, साखळी, मिटेवानी, दावेझरी, आंबागड़, मेहगांव, पिपरा, तुमसर येथील धान पिक संकटात आहेत. बावनथडी प्रकल्पाचे पाणी बघेड़ा जलाशयात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा आधार बघेड़ा जलाशय १५७ एकर असून बघेड़ा, चिचोली, पवनारा, साखळी, मिटेवानी, दावेझरी, आंबागड़, मेंहगाव, पिपरा,तुमसर येथील शेतकऱ्यांचा १,६०० हेक्टर जमिनीला सिंचन दरवर्षी होत आहे. शेतकरी बघेडा जलशयावर निर्भर असतात. परंतु यावर्षी वरुणराजाने वाट लावल्यामुळे जलाशयात पाणी साठवणूक नाहीच्या बरोबर झाले आहे. आतापर्यंत जलाशय अंतर्गत एक ओलीत शेतकऱ्यांच्या पदरात पडले. परंतु पुन्हा सिंचनाची गरज आहे. जलशयात पाण्याचा तुडवडा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता व्याप्त आहेत. लागवडीला अफाट खर्च येतो, कर्ज घेऊन शेती सजविली व पाण्याअभावी पिक करपले तर कर्ज फेडावे कसे, लाखोचा फटका बसेल, या भीतीने शेतकऱ्यांची झोप उडाली असून अनेक प्रश्न निर्माण झाले. बावनथडी प्रकल्पाचे पाणी बघेडा जलाशयात उपलब्ध केले तर बघेडा जलाशय अंतर्गत परिसरातील गावातील शेतीना सिंचन होऊन पिक होण्याची खात्री आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा दुष्काळ नाकारता येणार नाही. याकडे संबधित विभागानी विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांची समस्या सोडविण्याची गरज आहे.