आरक्षण सोडत नव्याने होणार

By Admin | Updated: March 15, 2015 00:48 IST2015-03-15T00:48:17+5:302015-03-15T00:48:17+5:30

जून महिन्यात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जानेवारी महिन्यात काढण्यात आली होती.

Resignation will be renewed | आरक्षण सोडत नव्याने होणार

आरक्षण सोडत नव्याने होणार

भंडारा : जून महिन्यात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जानेवारी महिन्यात काढण्यात आली होती. त्यानंतर तालुकास्तरावरच्या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा देण्यात आल्यामुळे आता आरक्षण सोडत पुन्हा नव्याने काढण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा कार्यक्रम घोषित झाला आहे.
५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या नवीन आरक्षण सोडतीच्यावेळीही तितकीच राहणार आहे. साकोली, लाखनी, लाखांदूर आणि मोहाडी या चार ग्रामपंचायतींचा समावेश नगरपंचायतीमध्ये झाल्यामुळे याठिकाणचे जिल्हा परिषद क्षेत्र वगळण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसंख्येनुसार मतदार संघाची फेररचना होणार आहे. त्यात भंडारा आणि तुमसर या तालुक्यात जिल्हा परिषदेचे प्रत्येकी एक आणि पंचायत समिती दोन क्षेत्र वाढणार असून मोहाडी आणि साकोली तालुक्यातून प्रत्येकी एक क्षेत्र कमी होणार आहे.
राज्य शासनाने राज्यातील १३९ ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा दिला आहे. त्यात भंडारा जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश होता. साकोली, लाखनी, लाखांदूर व मोहोडी येथे नगरपंचायत घोषित केल्यामुळे याठिकाणचे जिल्हा परिषद क्षेत्र वगळण्यात येणार आहे. या चारही तालुकास्तरावरच्या मतदाराचे मतदान नगरपंचायतीसाठी होणार असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार क्षेत्राची मतदार संख्या घटली आहे. असे असले तरी या निवडणुका ठरलेल्या कालावधीत होणार असल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे.
असा राहील कार्यक्रम
२० मार्चपर्यंत प्रारूप प्रस्ताव सादर करणे, २६ मार्च प्रस्तावास मान्यता देणे, २८ मार्च सोडत प्रकाशित करणे, ३१ मार्च आरक्षण सोडत काढणे, ६ एप्रिल अधिसूचना प्रसिद्ध करणे, १५ एप्रिल हरकती व सुचना सादर करणे, २७ एप्रिल सूचनांवर सुनावणी करणे, २९ एप्रिल अंतिम अधिसूचना जारी करणे असा कार्यक्रम आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Resignation will be renewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.