भंडाऱ्यात पारा ४२.५ अंशावर
By Admin | Updated: April 21, 2015 00:23 IST2015-04-21T00:23:35+5:302015-04-21T00:23:35+5:30
उन्हाळ्याची तीव्रता काय आहे ती मंगळवारी भंडाराकरांना जाणवली.

भंडाऱ्यात पारा ४२.५ अंशावर
भंडारा : उन्हाळ्याची तीव्रता काय आहे ती मंगळवारी भंडाराकरांना जाणवली. उष्णतेने यावर्षीचा उच्चांक गाठला. आजचे तापमान ४२.५ अंश सेल्सीअस नोंद करण्यात आली. आजच्या तापमानामुळे शहरातील प्रमुख मार्ग व बाजारपेठ ओस पडली होती.
वैषाख वणवा म्हणून ओळखला जाणारा वैषाख वणवा सुरु झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोठया प्रमाणात उष्णता राहील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाळयातून मोठा दिलासा मिळाला. आठवडाभर थंडीचे वातावरण निर्माण झाल्यानंतर अचानकपणे आता उष्णतेची प्रखरता जाणवू लागली आहे. मागील दोन दिवसांपासून तापमानात काही प्रमाणात वाढ झाली होती. आज यावर्षीचे उष्णतामानाचे विक्रम गाठला असून हवामान खात्याने भंडारा येथे ४२.५ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद केली आहे. आजच्या तापमानामुळे अगदी सकाळी १० वाजेपासूनच उन्हाची प्रखरता जाणवू लागल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे औचित्याचे समजले नाही.
उद्या अक्षयतृतीया हा महत्वाचा सण आहे. सणानिमित्त खरेदी करणा-यांची बाजारात मोठी गर्दी असते. उष्णतेमुळे अनेकांनी दुपारच्या वेळेस बाजारपेठेत जाणे टाळले. राष्ट्रीय महामार्गवरुन ऐरवी मोठी वर्दळ बघायला मिळते. मात्र, आजच्या विक्रमी तापमानामुळे बाजारपेठा तथा शहरातील मुख्य मार्ग निर्मनुष्य दिसून आले. आजच्या उष्णतेमुळे ख-या अर्थाने उन्हाळा सुरु झाल्याची प्रचीती नागरिकांना आल्याने अनेक दिवसांपासून बंद असलेले वातानुकूलीत यंत्र सुरु झाल्याचे सर्वत्र दिसत होते. (शहर प्रतिनिधी)