बसस्थानकाअभावी प्रवाशांची हेळसांड
By Admin | Updated: July 29, 2014 23:39 IST2014-07-29T23:39:41+5:302014-07-29T23:39:41+5:30
राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणादरम्यान मार्गातील अडथळांची तोडफोड करण्यात आली. यात ठाणा येथील बसस्थत्तनकाचा समावेश आहे. बसस्थानकाची तोडफोड झाल्याने येथील कर्मचारी,

बसस्थानकाअभावी प्रवाशांची हेळसांड
जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणादरम्यान मार्गातील अडथळांची तोडफोड करण्यात आली. यात ठाणा येथील बसस्थत्तनकाचा समावेश आहे. बसस्थानकाची तोडफोड झाल्याने येथील कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांना गैरसोय निर्माण झाली आहे.
मुजबी ते पारडी नाकापर्यंत रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या दरम्यान गावातील सांडपाणी वाहुन जाणाऱ्या नाल्या, रस्ते, बसस्थानक, पाणीपुरवठा प्रभावित झालेली आहे. भंडारा व नागपूरकडे जाण्याकरीता ठाणा टी-पार्इंट स्थित जुने बसस्थानक रूंदीकरणादरम्यान तोडण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या नियमानुसार बस स्थानक जंगशन पार्इंटवर न देता गावाच्या बाहेर किंवा जिथे अपघात होण्याची मुळीच शक्यता नाही तिथेच बांधण्यात येतात, असे प्राधीकरणाचे मत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे जुन्या ठाणा बसस्थानका दरम्यान अपघात न होता गावाच्या सिमेवर जास्त प्रमाणात अपघात झालेले आहेत.
गावाबाहेर बस स्थानक तयार करणार, आतापर्यंत पारडी ते मुजबीपर्यंत गावाच्या बाहेर बसस्थानक तयार करण्यात आले. मात्र निर्जन स्थळ बस थांबत नाही. परिणामी बसस्थानक धुळखात आहेत. हे स्थळ कायदा व सुव्यवस्था अबादीत राखण्याच्या दृष्टीकोनातून अयोग्य ठरणार आहे.
दिवसा व रात्री महिलांना प्रवास करणे कठीण होणार आहे. बस स्थानक ठाणा येथील जुन्या ठिकाणाहून स्थातांतरीत केल्याने कर्मचारी, वरिष्ठ ुअधिकारी, आयुध निर्माणीला भेट देणारे देश विदेशातील व्हिजीटर यांना गैरसोईचे होणार आहे. करीता नागपुरला जाण्याकरीता आयुध निर्माणी परिसर व महामार्गालगत व भंडाऱ्याकडे जाण्याकरीता आयुध निर्माणीच्या सोसायटीच्या जागेलगत तयार करण्यात यावे, यासंबंधी राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरण करणारे जे.एम.सीचे प्रकल्प निर्माणी भंडाराचे उपमुख्य कामगार कल्याण आयुक्त सी यांनी दि. २२ आॅगस्ट २०१३ रोजीच्या पत्रात नमूद केले होते.
याकडे संबंधित कंत्राटदाराने दुर्लक्ष केले. जुन्याच ठिकाणी बसस्थानक व्हावा, अशी परिसरातील तेराही ग्रामपंचायतची मागणी आहे. आजतागायत ठाणा येथे बसस्थानक निवारा नसल्यामुळे पावसात भिजत बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नितांत गरजेचे आहे. (वार्ताहर)