खंडविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी भंडारा : शिक्षकांच्या अनेक मागण्या मागील काही दिवसांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. त्यांची पूर्तता करण्याची मागणी केली असता केवळ आश्वासन दिले जाते. त्यामुळे मागण्या पूर्ण होत नसल्याने शिक्षकांमध्ये अनास्था वाढत आहे. याबाबत शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मोहाडी व पवनी शाखेच्यावतीने निवेदन देण्यात आले. पवनी तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी भगत व गटशिक्षणाधिकारी निमसरकार यांना तर मोहाडी तालुक्यातील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांना निवेदन दिले. दरम्यान दोन्ही ठिकाणी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. पवनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पवनीच्या वतीने संजीव बावनकर, रमेश नागपुरे, केशव मासुरकर यांच्या नेतृत्वात पवनीचे संवर्ग अधिकारी भगत व गटशिक्षणाधिकारी निमसरकार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात उत्तम कुंभारगावे, यशवंत मोहरकर, राम पवार, केदार खताळ, शैलेश दहातोंडे, दिलीप वैद्य, हरिदास धावडे, डी.के. मेश्राम, अनिरुद्ध नखाते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. मोहाडी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मोहाडीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद, गौरीशंकर वासनिक, दिनेश गायधने यांनी केले. यावेळी प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करून त्यांच्या पूर्ततेसंबंधी आश्वासन देण्यात आले. यावेळी बाळासाहेब आंधळे, अनिल गयगये, विठ्ठल गभणे, भगींदर बोरकर, विलास बाळबुधे, प्रकाश महालगावे, किशोर डोकरीमारे, हेमंत कावळे, राजकुमार चांदेवार, प्रदीप शेंडे, गुंडेराव भोयर, एम.जी. वडीचार, महादेव मोटघरे, सोनीराम मेश्राम, वसंत लिल्हारे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढा
By admin | Updated: January 7, 2016 01:02 IST