करडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद

By Admin | Updated: March 11, 2015 00:45 IST2015-03-11T00:45:31+5:302015-03-11T00:45:31+5:30

परिसरातील करडी, मोहगाव, नवेगाव, निलजखुर्द, निलज बुज, देव्हाडा नरसिंगटोला आदी गावांसाठी सन २००९ मध्ये करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली.

Off the Regional Water Supply Scheme | करडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद

करडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद

करडी (पालोरा) : परिसरातील करडी, मोहगाव, नवेगाव, निलजखुर्द, निलज बुज, देव्हाडा नरसिंगटोला आदी गावांसाठी सन २००९ मध्ये करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र सुरूवातीपासून योजनेचे ग्रहण सुटलेले नाही. अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य धोरणाचा फटका बसत आहे. टंचाई सदृष्य गावांमध्ये परिसराचा सामवेश असताना, पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत असताना सन २०१२ पासून योजना बंद आहे.
मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील गावांसाठी वैनगंगा शुगर अ‍ॅन्ड पॉवर कारखान्याच्या बाजुला दिड एकर जागेत करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार केली गेली. वैनगंगा नदीवरून ४ कि़मी. अंतरावरून पाणी पुरवठ्यासाठी पाईप लाईन टाकली गेली, नदीवरील पंप हाऊस व विहिर बांधली गेली. शुद्ध पाण्यासाठी फिल्टर प्लाँट, पाण्याची टाकी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारण्यात आले. गावोगावी उंच ठिकाणी पाण्याच्या साठवण टाक्या व पाईप लाईनचे वितरण जाळे तयार झाले.
मुख्य योजनेपासून गावापर्यंत १०-१२ कि़मी. अंतरापर्यंत मुख्य पाईप लाईन टाकली गेली. देखभाल आणि दुरूस्तीसाठी ४ कर्मचारी लावले गेले. योजनेसाठी जवळपास ४ कोटीचा खर्च केला गेला. सन २००९ मध्ये योजना तयार झाली. मात्र ३ वर्षे होऊनही उद्वस्त झाले नव्हते. अखेर नागरिकांच्या रेट्यामुळे व माध्यमांच्या दबावात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सन २०१२ मध्ये योजना सुरू करण्यात आली.
जानेवारी २०१२ मध्ये योजना एकदाच सुरू झाली. योजनेमध्ये समाविष्ट ५ गावातील नागरिकांना, पदाधिकाऱ्यांना नळ जोडणीसाठी प्रेरित केले गेले. नियमित पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न दाखविले गेले. त्यानुसार ४ गावात ५०० रूपये डिमांड भरून नागरिकांनी नळजोडणी केली. प्रति महिना ७० रूपये दराने कर आकारला गेला. मात्र फेब्रु्रवारी २०१२ मध्ये योजनेचे २६ हजाराचे बिल थकीत झाले, योजना बंद पडली. अधिकाऱ्यांना धारेवर धरून पुन्हा योजना सुरू होवून आठवडा लोटत नाही, तोच योजनेवरील कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी १ मार्च २०१२ पासून असहकार आंदोलन पुकारला. पुन्हा योजना बंद पडली. ती केव्हाच सुरू झाली नाही. (वार्ताहर)

Web Title: Off the Regional Water Supply Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.