माहिती अधिकाराचा अतिरेक
By Admin | Updated: March 3, 2016 00:51 IST2016-03-03T00:51:13+5:302016-03-03T00:51:13+5:30
सामान्य माणसाला माहिती अधिकार कायद्यामुळे मोठा आधार प्राप्त होऊन प्रशासनात पारदर्शकता आली.

माहिती अधिकाराचा अतिरेक
अधिकारी, कर्मचाऱ्यांत असंतोष : तुमसर तालुक्यातील प्रकार
तुमसर : सामान्य माणसाला माहिती अधिकार कायद्यामुळे मोठा आधार प्राप्त होऊन प्रशासनात पारदर्शकता आली. शासन व प्रशासनात गतीमानता आली, परंतु या कायद्याचा काहींनी अतिरेक केल्याचे तुमसर शहर व तालुक्यात दिसून येत आहे. काहीही संबंध नसतांनी अनेक विभागात माहिती मागणाऱ्यानी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाकीनऊ आणले आहे. त्यामुळे येथे असंतोषाचा भडका उडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
माहिती अधिकार कायदा सन २००५ मध्ये अस्तित्वात आला. सरंक्षण व इतर गोपनीय विभागाची माहिती व्यतिरिक्त सर्वसामान्यांना माहिती विचारण्याचा व प्राप्त करण्याचा हक्क या कायद्याने प्राप्त करुन दिला. माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सर्वसामान्य नागरिक येथे तशी माहिती संबंधित विभागाकडून घेतात. माहिती प्राप्त करुन देणे हे प्रत्येक विभागाचे काम आहे. पंरतु काहीनी येथे एक सवय म्हणून काहीही संबंध नसतानी माहिती अधिकाराचा अर्ज करण्याचा सपाटाच लावला आहे. यात शाळा, महाविद्यालय, नगरपरिषद, तहसील कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय, शासकीय रुग्णालये यांच्याकडे माहिती अधिकाराचे अनेक अर्ज सादर केले जात आहेत. कवडीमोल संबंध नसतानी माहिती अधिकारांचे अर्ज सादर का केले जात आहेत हा संशोधनाचा विषय आहे. संबंधित विभागाला महत्वपूर्ण कामे सोडून माहिती देण्याचेच काम सध्या संपत नाही असे चित्र दिसत आहे. या माहिती अधिकार अर्जामुळे अनुदानीत शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती मागितली नाही ती माहिती येथे माहिती अधिकार कार्यकर्ते मागीत आहेत हे विशेष. यात संबंधित शाळेची रोस्टरची साक्षांकित केलेली प्रत, शिक्षकांना संबंधित विभागाने दिलेली मान्यतेची प्रत अशांचा समावेश माहिती अधिकार कार्यकर्त्यांने मागितली आहे. माहिती अधिकाराचे प्रेणेते अण्णा हजारे यांनी सर्वसामान्याकरिता माहिती मागण्याकरिता हा अतिशय महत्वाचा कायदा शासनाची दोन हात करुन मिळवून दिला होता. हे विशेष. सध्या तुमसर शहर व तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांत या प्रकारामुळे असंतोष दिसत असून असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)