सातबारावरील 'त्या' नोंदी कमी करा

By Admin | Updated: April 25, 2016 00:33 IST2016-04-25T00:33:15+5:302016-04-25T00:33:15+5:30

अलिकडे चुलबंद निम्न प्रकल्पासंबंधीच्या सर्व अटी रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील काळात या नोंदी अडचणीच्या ठरू नयेत, ...

Reduce the 'those' records on the Satara | सातबारावरील 'त्या' नोंदी कमी करा

सातबारावरील 'त्या' नोंदी कमी करा

निम्न चुलबंद प्रकल्प : शेतकऱ्यांची महसूल विभागाकडे मागणी
सासरा : अलिकडे चुलबंद निम्न प्रकल्पासंबंधीच्या सर्व अटी रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील काळात या नोंदी अडचणीच्या ठरू नयेत, यासाठी या प्रकल्पासंदर्भात घेतलेल्या नोंदी महसूल विभागाने रद्द करून सातबारा कोरा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
साकोली तालुक्यात कुंभली (दुर्गाबाईचा डोह) येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम पूर्णत्वाला जात आहे. सदर प्रकल्प बऱ्याच वर्षापासून उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे साकोली तालुक् यातील बरीचशी शेती सिंचनाखाली येणार आहे. हा प्रकल्प शेतीच्या दृष्टीने महत्वाचा असला तरी शेतकऱ्यांच्या हिताचा ठरेल असे दिसून येत नाही. शेतीतून पिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टींचे नियोजन करावे लागते. शेतीची मशागत, बी बियाणे, लागवड, रासायनीक खते, कीटकनाशके, मजूर इत्यादी बाबींवर शेतकऱ्यांना बराच मोठा खर्च करावा लागतो.
या खर्चामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असतो. कुंभली चुलबंद निम्न प्रकल्पाचे पाणी सुद्धा शेतकऱ्यांना विकत घ्यावे लागणार आहे. परिणामी पिकांच्या उत्पादन मुल्यापेक्षा खर्चाचे मुल्य अधिक राहणार असल्याने शेतकरी वर्ग अधिक चिंतातूर झाला असल्याचे दिसून येत आहे. सदर प्रकल्पाचे बांधकाम सुरु करतेवेळी तालुक्यातील शेतीची खरेदी विक्री ठप्प करण्यात आली होती.
शासनाने या संबंधी काही अटी तयार केल्या होत्या. अटींच्या अधिनस्त राहून शेतीच्या खरेदी विक्रीसंबंधी महसूल विभागाकडून कारवाई केली जात होती. सततच्या नापिकीने अडचणीत आलेल्या सहा एकरावरील शेतकऱ्यांना शेतीची विक्री करताना जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन कारवाई करावी लागत होती. प्रकल्पपूर्तीच्या अटीनुसार अशा शेतकऱ्यांची एक चतुर्थांश शेतजमीन शासनाला हस्तांतरीत करावी लागत होती. (वार्ताहर)

Web Title: Reduce the 'those' records on the Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.