रेडीरेकनरची दरवाढ एप्रिलमध्ये

By Admin | Updated: January 8, 2016 00:28 IST2016-01-08T00:28:51+5:302016-01-08T00:28:51+5:30

दरवर्षी नवीन वर्षाला वाढणारे रेडिरेकनरचे दर यंदा 'जैसे थे' आहेत. जानेवारीमध्ये होणारी रेडिरेकनरमधील वाढ आता एप्रिलपासून करण्यात येणार आहे.

Redirection rises in April | रेडीरेकनरची दरवाढ एप्रिलमध्ये

रेडीरेकनरची दरवाढ एप्रिलमध्ये

दिलासा : तीन महिने राहणार जुनेच दर
अमरावती : दरवर्षी नवीन वर्षाला वाढणारे रेडिरेकनरचे दर यंदा 'जैसे थे' आहेत. जानेवारीमध्ये होणारी रेडिरेकनरमधील वाढ आता एप्रिलपासून करण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळकती व मोकळ्या जागांची खरेदी-विक्री करणाऱ्यांना बसणारा दरवाढीचा फटका मार्चपर्यंत तरी बसणार नाही.
गेल्या वर्षी २०१५ जानेवारीमध्ये व्यवहारसंदर्भातील वार्षिक मूल्यदर अर्थात रेडिरेकनरमध्ये १५ टक्के वाढ झाली होती. मुळात रिअल इस्टेट मार्केट तेजीत तरी मंदीचे वातावरण असल्याने बांधकाम व्यावसायिक शांत आहेत. जिल्ह्यात ७ ते ८ हजार फ्लॅट विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर सध्यातरी मंदीचे सावट आहे. ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीचा खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुद्रांक शुल्क विभाग रेडिरेकनरच्या दरात ५ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ करीत असते. त्यामुळे नवीन वर्षात जमीन, मोकळ्या जागा आणि घरांचे खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम होऊन त्याच्या किमती वाढतात. या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे दर वाढल्याने शासनाला स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून जादा महसूल मिळतो. महापालिका क्षेत्रात प्रत्येक भागाचा स्वतंत्र रेडिरेकनरचा दर असतो. त्यामुळे काही जागांचा दर शासकीय दरापेक्षा अधिक राहतो. खुली जागा, निवासा इमारत, वरच्या तसेच तळमजल्यावरील कार्यालय व व्यवसायासाठी हा सुधारित दर लागू असतो. तथापी अजून तीन महिने राज्यात जुन्याच रेडिरेकनरने व्यवहार होणार आहेत. जमीन, प्लॉट, खरेदी-विक्री तसेच रेडिरेकनरच्या दरात वाढ होत असल्याने पर्यायाने स्टॅम्प ड्युटीची रक्कम वाढते. नगरपालिका क्षेत्रात मात्र एक टक्का अधिभार लागू असल्याने तेथे व्यवहारावर एक टक्का अधिक रकमेची आकारणी होते. पण यावर्षी डिसेंबरअखेरीस रेडिरेकनरच्या दरात वाढ झालेली नाही. मुद्रांक शुल्क विभागाने तेच दर मार्चपर्यंत पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जमिनी, फ्लॅटच्या दरात वाढ होणार नाही. गेल्यावर्षीचेच दर तीन महिने राहणार असल्याने गेल्या वर्षीच्याच दराने जागा व फ्लॅट खरेदी करता येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Redirection rises in April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.