५.१८ लाखांच्या दंडाची वसुली

By Admin | Updated: July 17, 2015 00:32 IST2015-07-17T00:32:20+5:302015-07-17T00:32:20+5:30

तालुक्यातील वैनगंगा नदीच्या विविध घाटावरून अधिकृतरित्या रेती उपसा करण्यासाठी घाटाचे रितसर लिलाव झालेले आहेत.

Recovery of fine of 5.18 lakh | ५.१८ लाखांच्या दंडाची वसुली

५.१८ लाखांच्या दंडाची वसुली

रेती वाहतूकप्रकरण : पवनीतील कारवाई, दिवसरात्र रेतीचा उपसा करून चोरीत वाढ
ंअशोक पारधी पवनी
तालुक्यातील वैनगंगा नदीच्या विविध घाटावरून अधिकृतरित्या रेती उपसा करण्यासाठी घाटाचे रितसर लिलाव झालेले आहेत. तरीदेखील संपुष्टात आलेले नाही. झटपट श्रीमंत होण्यासाठी नामांकित लोकांनी रेतीघाटाकडे लक्ष केंद्रीत केलेला आहे. नियमाप्रमाणे रेतीचा उपसा करणे, वाहतूक करणे यामुळे झटपट श्रीमंती पदरी पडत नाही. त्यामुळे चौर्यकर्म हा उपाय रेतीमाफियांनी शोधून काढला. संबंधित अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असेल तर सहजरित्या चोरी करता येते असा 'फार्मुला' वापरून दिवसरात्र रेतीचा उपसा करून चोरी होवू लागली आहे.
वृत्तपत्रात बातम्या लागल्या की एखादी कार्यवाही करायची व पुन्हा स्वस्थ बसायचे, असे धोरण जिल्ह्यापासून तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी ठरवून ठेवलेले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू असते. १३ जुलै रोजी निलज फाट्यावर अडविण्यात आलेले ओव्हरलोड ट्रक हा कार्यवाहीचा एक भाग आहे.
तहसील कार्यालयाकडून अडविण्यात आलेल्या ३३ ट्रक मालकांकडून ६ लाख २० हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली. त्यापैकी ५ लाख १८ हजार २०० दंडाची रक्कम तहसिलदार नरेंद्र राचेलवार यांनी १५ जुलैपर्यंत वसूल केली. शासनाचे तिजोरीत रक्कम जमा झाली. आतापर्यंत दंडाची रक्कम वसूल करून रेती जप्त करून ट्रक सोडले जात होते. परंतु पहिल्यांदाच ३३ ट्रकसह रेती जप्त करण्यात आलेली आहे. सर्व ट्रक पवनीचे बस आगारात उभे करण्यात आले. प्रति ट्रक ३०० रूपये जागेचा पार्किंग भाडा ट्रक मालकाकडून दरदिवसाला वसूल केल्या जात आहे.
१३ जून २०१५ चे महसूल व वनविभागाच्या अध्यादेशाचा आधार घेवून ट्रक मालकावर ट्रक जप्तीची कार्यवाही करण्यात येत असल्याचे तहसिलदार राचेलवार यांनी सांगितले. परंतु दि. १३ जुलै ते १६ जुलै या दरम्यान ट्रक मालकांचे ट्रक कामाशिवाय उभे ठेवण्यात आलेले आहेत. दरम्यान नहरात बुडून एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. वाहतुकीचा रोजगार करणाऱ्या ट्रक मालकवर शासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतू रेतीघाटावरून क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून दिल्या जात आहे. त्या झटपट श्रीमंत होण्यासाठी एवढा आटापिटा करणाऱ्या घाट लिलावात घेणाऱ्या व्यावसायीकांवर कार्यवाही करण्यास प्रशासन मागेपुढे पाहत आहे.
रेतीची चोरी असो की क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक याचे मुळ उगमस्थान रेतीघाट असल्याने त्यावर कार्यवाही व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. जप्त केलेले ट्रक सुरक्षित राहावे यासाठी तहसिलदार नरेंद्र राचेलवार व त्यांचे कर्मचारी, पोलीस निरीक्षक मधुकर गिते व पोलीस कर्मचारी पुर्णवेळ कार्यरत होते.

Web Title: Recovery of fine of 5.18 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.