हेक्टरी ४७ क्विंटल हरभरा पिकाच्या उत्पादनाचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:45+5:302021-07-03T04:22:45+5:30
अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार मून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, कृषी ...

हेक्टरी ४७ क्विंटल हरभरा पिकाच्या उत्पादनाचा विक्रम
अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार मून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी विश्वजीत पाडवी, कृषी उपसंचालक अरुण बलसाने, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मोहीम अधिकारी व्ही.एम. चौधरी उपस्थित होते. एकीकडे शेती परवडत नसल्याची ओरड होत आहे तर दुसरीकडे अडचणींवर मात करून शेती व्यवसायातून विक्रमी म्हणजेच ४७ क्विंटल हरभऱ्याचे उत्पन्न घेत विष्णू हटवार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. पीक स्पर्धेत चिखली येथील विष्णुदास हटवार यांचा जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक तर महिला शेतकरी मनीषा गायधने यांचा भंडारा तालुकास्तरावर तृतीय क्रमांक आला आहे. त्यामुळे भंडारा तालुक्याने पीक स्पर्धेत आपली चांगली छाप पाडली आहे. कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले, शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर व रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन लागवड, पिकेल ते विकेल अभियाना संदर्भात माहिती देणे पीक उत्पादनासाठी गावोगावी मार्गदर्शन केल्याची माहिती भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश यांनी दिली.
कोट
रब्बी पीक स्पर्धेत भंडारा तालुक्यातील चिखलीचे शेतकरी विष्णुदास हटवार यांनी हेक्टरी ४७ क्विंटल उत्पन्नाचा शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. यासोबतच राज्यस्तरावर तानाजी गायधने यांनाही कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याने चिखली गावच्या शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात आपली छाप पाडली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात आधुनिक शेतीची कास धरावी.
अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी, भंडारा