जिल्ह्यात आढळले दुर्मिळ राजहंस बदक व पांढरे करकोच

By Admin | Updated: March 4, 2016 00:37 IST2016-03-04T00:37:24+5:302016-03-04T00:37:24+5:30

ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबद्वारे सातत्याने १५ व्या वर्षीसुद्धा भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ४० तलावावरील स्थलांतरीत पाणपक्ष्यांची गणना करण्यात आली.

The rare swans found in the district are duck and white karacoch | जिल्ह्यात आढळले दुर्मिळ राजहंस बदक व पांढरे करकोच

जिल्ह्यात आढळले दुर्मिळ राजहंस बदक व पांढरे करकोच

व्हाईट स्टार्क पक्ष्याची नोंद : ग्रीनफ्रेन्डस्तर्फे पक्षीनिरीक्षण व पक्षीगणना
चंदन मोटघरे  लाखनी
ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबद्वारे सातत्याने १५ व्या वर्षीसुद्धा भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ४० तलावावरील स्थलांतरीत पाणपक्ष्यांची गणना करण्यात आली. यावर्षी भंडारा जिल्ह्यात प्रथमच स्थलांतरीत दुर्मिळ राजहंस बदले व व्हाईट स्टार्क पक्षी पांढरे करकोच विविध तलावावर दिसून आले.
यावर्षी ३० च्या संख्येने राजहंस बदके भंडारा जिल्ह्यात चार तलावावर आढळली आहेत तसेच स्थलांतरीत पांढरा करकोचा व्हाईट स्टार्क पक्षी प्रथमच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील तलावावर आढळला आहे. भंडारा जिल्ह्याच्या स्थलांतरीत पक्षी वैभवात दुर्मिळ पक्ष्यांची भर पडली आहे. यासोबत ग्रे लंग गुज, चमचाचोच बदक, पिनटेल, मोठी लालझरी आदी प्रकाराची बदके आढळली आहेत. ग्रीनफ्रेन्डस्चे संघटक प्रा. अशोक गायधने यांच्या नेतृत्वात पक्षीगणना करण्यात आली.
दुर्मिळ राजहंस बदकाच्या डोक्यावर दोन काळ्या रेषा असल्याने त्यात पट्टकांदळ किंवा बारहेडेड गुज असे म्हणतात. हे बदक सैबेरिया, मंगोलिया, लडाख, लेट, काश्मिर भागात यांचे वास्तव्य असते. आतापर्यंत हे बदक दरवर्षी चंद्रपूर, नागपूर, वर्धा व उर्वरित विदर्भात यांची उपस्थिती असते. दुर्मिळ व्हाईट स्टार्क पक्ष्याची नोंद फार कमी वेळा विदर्भात झाली असून हा पक्षी भंडारा-गोंदिया व पुर्व विदर्भातील तलावांवर प्रथमच आढळला आहे. रिचर्ड ग्रिमेंट, इनस्कीप यांच्या पक्षी पुस्तकात मध्य भारत, उत्तर भारतात फारच तुरळक नोंदी आहेत.
हा पक्षी रंगित करकोचा पेंटेड स्टार्क प्रमाणे प्रथमदर्शनी नजरेस पडतो परंतु चांगले निरखुन पाहिले असता रंगित करकोचा उघड्या चोचीचा बलाक ओपन बील स्टार्ड या पक्षंपेक्षा वेगळा फरक दिसत असल्याचे सांगितले. या पक्ष्याची चोच व पाय हे लालसर असून हा युरोपातून इरानण अफगाणीस्तान, पाकिस्तानमार्गे भारतात तुरळक ठिकाणी भेट देत असतो. याचा पंख व शेपटीचा भाग काळसर असतो.
याबरोबरच दुर्मिळ कलहंस बदके, चक्रवाल, नकटा, लहान स्वरल, गढवाले, तरंग, धनवर बदक, थापट्या, अटला बदक, चक्रांग बदक, भुवई, तलवार बदक, मोठी लालसरी, साधी लालसरी, शेंडीबदक, नयनसरी या बदकासोबत शेकाट्या, चिखत्या, पियु, कमलपक्षी, चमचाचोच बदक, चांदी बदक, पाणडुबी, जांभळी पाणकोंबडी, तुतवार, उघड्या चोचीचा करकोचा, ग्रेहेरान, पर्पल हेरान, किंगफिशर व्हाईट व ब्लॅक तसेच ग्लासी आयबिस इत्यादी प्रकारचे पाणपक्षी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर पक्षीनिरीक्षण व पक्षीगणना करण्यात आली.

Web Title: The rare swans found in the district are duck and white karacoch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.