शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विरलीत कोरोनाबाधित रुग्णांची गावभर भ्रमंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 05:00 IST

सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत कोरोना चाचणीची मोहीम व्यापक स्तरावर राबविली जात आहे. परिणामी बाधित रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. अशा बाधित रुग्णांना प्रशासनाने होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्याचे, तसेच ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी आढळून आल्यास किंवा तत्सम परिस्थिती असल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देविलगीकरणाचा फज्जा : प्रशासनाचे दुर्लक्ष; कोरोनाविरुद्ध लढा जिंकणार कसा?

लाेकमत न्यूज नेटवर्कविरली(बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली येथे कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून, दररोज सुमारे १५ ते २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. रविवारपर्यंत येथे १०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, येथील काही कोरोनाबाधित रुग्ण विलगीकरणाचा पार फज्जा उडवून गावभर मुक्त भ्रमण करीत आहेत. अशा रुग्णांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या हलगर्जीपणामुळे आपण कोरोनाविरुद्धचा लढा जिंकणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत कोरोना चाचणीची मोहीम व्यापक स्तरावर राबविली जात आहे. परिणामी बाधित रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. अशा बाधित रुग्णांना प्रशासनाने होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्याचे, तसेच ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी आढळून आल्यास किंवा तत्सम परिस्थिती असल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे आदेश दिले आहेत.येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १०४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती येथील उपकेंद्राकडून मिळाली आहे. यापैकी काही कोरोनाबाधित रुग्णांचा गावात मुक्त संचार सुरू असून, स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समजते.कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी बाधित झालेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जाते. गृह विलागीकरणाच्या नियमानुसार कोरोनाबाधित व्यक्तींना किमान कोरोनाची पुनर्चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत घराबाहेर न निघण्याचे व कुणाच्याही संपर्कात न येण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाच्या नियम धाब्यावर बसवून काही विघ्नसंतोषी कोरोनाबाधित व्यक्ती राजरोसपणे गावात भ्रमण करताना दिसतात. या कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात गावातील इतर व्यक्ती आल्यास इतरांनाही याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रुग्णांवर देखरेख ठेवणे तितकेच महत्त्वाचे असून, प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. येथील अशा परिस्थितीमुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाकडे विलगीकरणासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था नसते. अशा परिस्थितीत एकत्र राहत असताना कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात कुटुंबातील इतर सदस्य येऊ नयेत आणि कोरोनाचा संसर्ग इतरांना होऊ नये या उद्देशाने ग्रामपंचायतीने विलगीकरणासाठी वेगळ्या विलगीकरण केंद्राची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत विलगीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, या विलगीकरण केंद्राकडे अनेक मनमौजी रुग्णांनी पाठ फिरविली असून, स्वतःच्या घरीच मनसोक्तपणे गृहविलगीकरणात राहणे अनेकांनी पसंत केले आहे. या विलगीकरण केंद्राचा केवळ आठ रुग्ण लाभ घेत आहेत. भंडारा जिल्ह्यात दररोज हजाराच्या वर रुग्ण आढळत असल्याने काटेकोरपणे कोरोना नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे. 

ग्राम शीघ्र प्रतिसाद समितीने तत्परता दाखवावी गतवर्षी २४ मार्चला येथील ग्राम प्रशासनातर्फे येथे ग्राम शीघ्र प्रतिसाद समितीची स्थापना करण्यात आली. या समितीकडे  काही जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या प्रामाणिकपणे, निष्ठेने पार पडल्या. मात्र, लॉकडाऊन संपल्यानंतर या समितीचे अस्तित्वच मिटले. येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या गावात मुक्त संचारावर ग्राम शीघ्र प्रतिसाद समिती नक्कीच आळा घालू शकते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या