शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

 भंडारा जिल्ह्यातील माेहरणाचा रँचो; पंक्चर फ्री रसायन तयार करून बेरोजगारीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 3:46 PM

Bhandara News मोहरणा येथील एका अभियंत्याने पंक्चर फ्री रसायन तयार केले. पंक्चरची समस्याच सोडविली नाही तर आपल्या गावातच अर्थार्जनाचा मार्गही शोधला. भागवत राऊत असे या रँचोचे नाव आहे.

ठळक मुद्दे खासगी कंपनीतील नोकरी सोडून गावातच संशोधन

दयाल भोवते 

लोकमत न्यूज नेटवर्क  

 भंडारा  : दुचाकीचा ट्युबलेस टायर पंचर झाला तरी काही अंतरावर चालतो. पण पंचर दुचाकीवर दोघे गाडीने जाऊ शकत नाही. समजा गेले तरी टायरला छोटे छोटे अनेक पंक्चर होतील. अल्पावधितच टायर बदलवावा लागेल. या समस्येला कंटाळून तालुक्यातील मोहरणा येथील एका अभियंत्याने पंक्चर फ्री रसायन तयार केले. पंक्चरची समस्याच सोडविली नाही तर आपल्या गावातच अर्थार्जनाचा मार्गही शोधला. भागवत राऊत असे या रँचोचे नाव असून नवनवीन रसायन तयार करण्यासाठी संशोधन करीत आहे.

सध्याचे युग हे यांत्रिकीकरणाचे युग आहे. या युगातील प्रत्येक व्यक्ती धडपडत असल्याचे दिसून येते. कोणी रोजगारासाठी, कोणी नोकरीसाठी, तर कोणी जगण्यासाठी धडपडतानाचे दिसतात. भागवतचे प्राथमिक शिक्षण मोहरणा या गावी झाले. १२ वीपर्यंतचे शिक्षण ब्रम्हपुरी येथे झाले. छत्तीसगढ राज्यातील भिलाई येथील स्वामी विवेकानंद विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजमधून मेकॅनिकल शाखेत अभियांत्रिकी केली. ग्रामीण भागातील एका तरूणाने अभियांत्रीकीचे शिक्षण पूर्ण केले. जिज्ञासू व संशोधक वृत्ती असणाऱ्या भागवतने महाविद्यालयीन जीवनात ध्वनीच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याचा अफलातून प्रयोग केला हाेता.

खासगी कंपनीत काही काळ नोकरी केली. मात्र त्याचे मन महानगरात रमत नव्हते. त्यातच कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. नोकरी सोडून त्याने थेट मोहरणा गाठले. सुरूवातीला गावातील लोकांनी त्याला वेड्यात काढले. पण तो डगमगला नाही. आपले संशोधन सुरू ठेवले. लॉकडाऊन दरम्यान त्याने बाहेरुन विविध कच्ची सामुग्री बोलवुन पंक्चर फ्री रसायन तयार केले. त्याच्या संशोधनाने ग्रामीण भागातील दुचाकी पंक्चरची समस्या काही अंशी सुटली.

रसायन असे करते काम

ट्यूब लेस टायरच्या गोट मधून हवा लीक होणे, दुरुस्त केलेल्या पंचरच्या दोरीतून हवा लिक होणे, छोट्या-छोट्या छिद्रामधून हवा जाणे, हवा कुठून जाते ते माहितीही हाेत नाही. यामुळेच दुचाकीधारकाला विविध समस्यांचा समाना करावा लागतो. पंक्चर झाल्यानंतर भागवतने तयार केले रसायन टायरमध्ये टाकल्यानंतर पंक्चर असेल तर तो दुरुस्त होतो. टायरला असणार छोट्या छिद्रातून रसायन बाहेर येऊन छिद्र बुजविण्याचे काम करते. टायरमध्ये सुरुवातीपासूनच रसायन टाकून ठेवले तर टायर पंचर होत नाही. परिणामी टायरची आयुमर्यादादेखील वाढते, रसायन तब्बल तीन वर्षापर्यंत टायरला सुरक्षा देत असल्याची माहिती अभियंता भागवत राऊत यांनी दिली आहे.

टॅग्स :scienceविज्ञान