मस्जिद में रामायण, मंदिर में कुराण देखना चाहती हूं !
By Admin | Updated: June 30, 2016 00:38 IST2016-06-30T00:38:59+5:302016-06-30T00:38:59+5:30
मैं आदमी के अंदर इन्सान देखना चाहती हूँ,.....

मस्जिद में रामायण, मंदिर में कुराण देखना चाहती हूं !
जवाहरनगर येथे हिंदी कवी संमेलन : श्रोत्यांनी दिली भरभरून दाद
प्रल्हाद हुमणे जवाहरनगर
मैं आदमी के अंदर
इन्सान देखना चाहती हूँ,
शहीदों के सपनों का
ओ हिंदुस्थान देखना चाहती हूँ
लोग लडते है मंदिर मस्जिद के लिए
और मै मस्जिद में रामायण,
मंदिर में कुराण देखना चाहती हूं !
जवाहरनगर बहुउद्देशिय सभागृहात मंगळवारला अखिल भारतीय हिंदी कवी संमेलनात कवयित्री लता शबनम यांनी ही कविता सादर केली आणि उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या आवाजात भरभरून दाद दिली.
भंडारा आयुध निर्माणी एम्प्लॉईज युनियनच्या स्वर्ण जयंती स्थापना दिनानिमित्त अखिल भारतीय हिंदी कवी संमेलनात कवयित्री शबनम यांनी कविता सादर केल्या. आजच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या,
किसी गली किसी वार्ड
की जरूरत क्या है
किसी महेफिल किसी
अवार्ड की जरुरत क्या है
जब दिल मिला दिल से
तो राशन कार्ड की जरुरत क्या है
कवी प्रदीपस्वामी रामपायली यांनी मनुष्याच्या मरणापूर्वी व नंतर कशी अवस्था होते, ते कवितेतून सादर केले. आपल्या कवितेत बेरोजगार, भुखमरी याविषयी मार्मीकतेने विशद केले. देशाची सद्यस्थितीची आपल्या कवितेतून कवी मनोज पाराशर यांनी बाबा रामदेव यांच्या अलिकडील वक्तव्यातून विशद केले,
देश को खतरा काले धनवालों से
बाबा पर ध्यान मत दिजीए
एक लंबी एडी सांस लिजीए
धीरे धीर छोड दिजीए
अरे देश को खतरा
काले धन वालों से कम
काले मन वालों से जादा है
याप्रसंगी सुनिल सम्मया (बिना), मनोज मद्रासी यांनी विद्रोही कविता सादर केली. त्यांनी आई-वडीलांना मुलांकडून होणारे आघात, देशांची अर्थव्यवस्था या विषयावर कविता सादर केली. मुकेश मनमौजी (सिवनी), मनोज मद्रासी (निजामाबाद), आर.के. प्रखर (विदीशा), आनंद सिंगीतवार (चांदा) यांनी आपली कविता सादर केली. अध्यक्षस्थानी सचिव ए.एन. मोरे हे होते. संमेलनाचे सूत्रसंचालन हास्य व व्यंग कवी सुनील सम्मय्या यांनी केले.