शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

जिल्ह्यात पाऊस बेपत्ता, रोवणीची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:43 PM

जिल्ह्यात गत दोन आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाला असून चिंतातूर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्केच पावसाची नोंद झाली असून गतवर्षी याच काळात ३३ टक्के पाऊस पडला होता. निम्म्यापेक्षा अधिक रोवणीही झाली होती. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ५ टक्केच रोवणी आटोपली असून शेतातील पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे : वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत दोन आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाला असून चिंतातूर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्केच पावसाची नोंद झाली असून गतवर्षी याच काळात ३३ टक्के पाऊस पडला होता. निम्म्यापेक्षा अधिक रोवणीही झाली होती. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ५ टक्केच रोवणी आटोपली असून शेतातील पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.भंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. भाताच्या शेतीसाठी मुबलक पावसाची गरज असते. भंडारा जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १३३०.२ मिमी आहे. तर १ जून ते १६ जुलै पर्यंत जिल्ह्यात सरासरी ४२३ मिमी पाऊस कोसळतो. मात्र यंदा वरुण राजा शेतकºयांवर कोपल्याचे दिसत आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. आद्रा नक्षत्रात पाऊस कोसळला. परंतु तो रोवणीयोग्यच नव्हता. जिल्ह्यात १ जून ते १६ जुलै या कालावधीत २५४.२ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्के तर सद्य कालावधीच्या ६० टक्के आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत ४४४.९ मिमी पाऊस कोसळला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात अर्ध्या अधिक रोवणीची कामे आटोपली होती. परंतु यंदा रोवणीयोग्य पाऊसच झाला नाही. धानाच्या बांध्यात पाणीच साचले नाही. शेतात असलेले पऱ्हे पिवळे पडत आहे. या पºह्यांना वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. परंतु अपुऱ्या विजेअभावी त्यांनाही सिंचन करणे कठीण जात आहे.जिल्ह्यात २ लाख ३ हजार ६१६ हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ८० हजार १२५ हेक्टर क्षेत्र केवळ भाताचे आहे. परंतु पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात केवळ ५ टक्के रोवणी आटोपली आहे. हवामान खाते दररोज नवनवीन हवामानाचा अंदाज वर्तवित आहे. परंतु प्रत्येक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाचा निघत आहे. शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत. परंतु पाऊस पडण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. अपुऱ्या पावसाने धान शेती तर धोक्यात आलीच त्यासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.रोवणी झालेल्या शेताला भेगाकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्या आहेत. जलसाठ्यात वेगाने घट होत असून पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. १५ दिवसापासून पाऊस कोसळला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. पऱ्हे पिवळे पडून कोमेजत आहेत. सिंचनाची साधने असणाऱ्या शेतकऱ्यांनी विहिर, नाले व तलावाच्या माध्यमातून रोवणी केली. मात्र आता पावसाअभावी रोवणी पूर्णत: ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट बेचैन करीत आहे. रोवणी झालेल्या शेतात तडे पडले असून शेतकºयांच्या डोळ्यात पाणी येत आहे.