तुमसर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:58 IST2019-06-16T00:57:40+5:302019-06-16T00:58:20+5:30
शहर व तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. सुसाट वाऱ्यात अनेक घरांचे पत्रे उडाले. अचानक पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली. सुमारे पाऊणतास पाऊस बरसला. ग्रामीण परिसरात झाडे उन्मळून पडल्याची माहिती आहे.

तुमसर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शहर व तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. सुसाट वाऱ्यात अनेक घरांचे पत्रे उडाले. अचानक पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली. सुमारे पाऊणतास पाऊस बरसला. ग्रामीण परिसरात झाडे उन्मळून पडल्याची माहिती आहे. शुक्रवार व शनिवारी पावसाने तुमसर तालुक्यात दमदार हजेरी लावली.
शनिवारी दुपारपासून आकाश ढगाळलेला होता. सायंकाळी ५ च्या सुमारास वादळी वारा सुरु झाला. ५.२५ वाजताच्या सुमारास मेघ गर्जनेसह पाण्याच्या जोरदार सरी कोसळल्या. वाºयाचा वेग मोठा होता. त्यामुळे अनेक कौलारु घरांची पडझड झाली. टीन उडाले. झाडे उन्मळून पडल्याची माहिती आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
मागील दोन महिन्यापासून अंगाची लाही लाही करणारी उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. सायंकाळी बारीक सरी कोसळत होत्या.
सर्वात जास्त नुकसान ग्रामीण भागात झाल्याची माहिती आहे. रस्त्याशेजारील झाडे पडल्याची माहिती आहे. वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. दरम्यान मुसळधार पावसामुळे धरणी शांत झाली. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. शेतकरीही आता मशागतीच्या कामाला लागला.
वीज कोसळून शेतकरी ठार
मोहाडी : तालुक्यातील महालगाव शेतशिवारात अंगावर वीज कोसळल्याने ४२ वर्षीय शेतकरी जागीच ठार झाला. रंगलाल ढबाले असे मृताचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसला. याचवेळी रंगलालच्या अंगावर वीज कोसळली. त्यांची पत्नी ही अन्य बाजूला असल्याने ती थोडक्यात बचावली. घटनेची माहिती पोलीस तथा महसूल प्रशासनाला देण्यात आली. तपास मोहाडीचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम करीत आहेत.