सात वर्षांपासून वार्षिक सरासरीपेक्षा पाऊस कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST2021-07-23T05:00:00+5:302021-07-23T05:00:12+5:30
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धान पिकासाठी मुबलक पावसाची गरज असते. अपुरा पाऊस पडला की त्याचा थेट परिणाम धान उत्पादनावर हाेताे. गत सात वर्षांतील पावसाची आकडेवारी बघितल्यास पावसाने वार्षिक सरासरही गाठल्याचे दिसून येत नाही. २०१४ साली जिल्ह्यात ८८८.६० मि.मी. पावसाची नाेंद झाली हाेती. वार्षिक सरासरीच्या ६९ टक्के पाऊस हाेता. २०१५ मध्ये १०७०.१७ मि.मी. पाऊस काेसळला. हा पाऊस ८४ टक्के हाेता.

सात वर्षांपासून वार्षिक सरासरीपेक्षा पाऊस कमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : हमखास पावसाचा प्रदेश म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख असली तरी, गत सात वर्षांत पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मि.मी. असताना २०१४ ते २०२० या सात वर्षांत सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला. या कमी पावसाचा फटका धान उत्पादनाला बसत आहे. यंदाही पावसाने दडी मारली असून, अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील राेवणी खाेळंबलेली आहे.
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धान पिकासाठी मुबलक पावसाची गरज असते. अपुरा पाऊस पडला की त्याचा थेट परिणाम धान उत्पादनावर हाेताे. गत सात वर्षांतील पावसाची आकडेवारी बघितल्यास पावसाने वार्षिक सरासरही गाठल्याचे दिसून येत नाही. २०१४ साली जिल्ह्यात ८८८.६० मि.मी. पावसाची नाेंद झाली हाेती. वार्षिक सरासरीच्या ६९ टक्के पाऊस हाेता. २०१५ मध्ये १०७०.१७ मि.मी. पाऊस काेसळला. हा पाऊस ८४ टक्के हाेता.
२०१६ मध्ये ९११.०९ मि.मी. म्हणजे ७१ टक्के पाऊस काेसळला. २०१७ मध्ये ८८४.०१ मि.मी. अर्थात ६७ टक्के, २०१८ मध्ये १००७.८ मि.मी. म्हणजे ७६ टक्के, २०१९ मध्ये १२९७.३ मि.मी. म्हणजे ९८ टक्के आणि गतवर्षी ११८७.३ मि.मी. म्हणजे ८९ टक्के पाऊस काेसळला. २०१९ मध्ये सरासरीच्या जवळ पाऊस पाेहाेचला; परंतु सहा वर्षांत पाऊस ७५ टक्क्यांच्या आसपास काेसळला.
जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात तलाव असून, या तलावाची संचयक्षमता माेठी आहे; परंतु अलीकडल्या काळात तलावांमध्ये पुरेसे पाणी संचित हाेत नाही. तलावातील गाळ हे मुख्य कारण असले तरी पाणलाेट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी हाेत असल्याचा हा परिणाम आहे. वनसंपदेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात पावसाचे प्रमाण कमी हाेणे हे आगामी काळासाठी धाेक्याची घंटा आहे.
सन २०१३ मध्ये १३२ टक्के पावसाची नाेंद
सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ साली जिल्ह्यात सर्वत्र धाे-धाे पाऊस बरसला हाेता. १६८४.३४ मि.मी. म्हणजे १३२ टक्के पाऊस काेसळला हाेता. वार्षिक सरासरीच्या ३२ टक्के पाऊस त्या वर्षी काेसळला. त्यानंतर आजपर्यंत एकदाही पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही.
मध्यप्रदेशातील पावसाने येताे महापूर
भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण हाेण्याला मध्यप्रदेशात पडणारा पाऊस आणि मध्यप्रकल्पातील अतिरिक्त पाणी कारणीभूत आहे. गतवर्षी भंडारा जिल्ह्यात आलेल्या महापुराने हाहाकार उडविला हाेता. शेकडाे हेक्टरवरील पीक नष्ट झाले हाेते. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह्यात ८९ टक्के पाऊस झाला हाेता. मात्र महापूर आला. मध्यप्रदेशातील संजय सराेवरातील पाणी साेडल्याने ही स्थिती निर्माण झाली हाेती.