आमगाव येथे पावसाचे पाणी घरात
By Admin | Updated: June 21, 2014 23:51 IST2014-06-21T23:51:39+5:302014-06-21T23:51:39+5:30
आमगाव येथे डांबरीकरण ते तसरे यांच्या घरापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. मात्र रस्त्याच्या कडेला नाली नसल्याने गावकऱ्यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसले.

आमगाव येथे पावसाचे पाणी घरात
आमगाव दिघोरी : आमगाव येथे डांबरीकरण ते तसरे यांच्या घरापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. मात्र रस्त्याच्या कडेला नाली नसल्याने गावकऱ्यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसले.
ग्रामपंचायतने या वर्षी हा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. रस्ता अरुंद असल्याने नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. मात्र रस्त्याच्या कडेला पाईप, मुरुम घालून देण्याचे आश्वासन ग्रा.पं. ने दिले होते. तसेच मात्र अजूनपर्यंत हे काम करण्यात आले नाही. पहिल्याच पावसाचे पाणी विठ्ठल कडुकार, मधु लुटे यांच्या अंगणामध्ये साचले असून यांना घराच्या बाहेर निघायला कठीण झाले आहे. हा साचलेला पाणी निघायला मार्ग नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची तसेच सरपटणाऱ्या जीवजंतूपासून भीती निर्माण झाली आहे. पावसाचे पाण्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. (वार्ताहर)