शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाऊस ओसरला, पूर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात गत २४ तासात ६६.९ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात १०२ मिमी नोंदविला गेला. भंडारा ७४.३, मोहाडी ८५.३, पवनी २०.६, साकोली ८०, लाखांदूर २८.३, लाखनी ७८ मिमी पावसाची नोंद झाली. २४ तास अविश्रांत झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय झाला आहे. भंडारा शहरासह तालुक्यातील १९ गावांना पूराचा पाण्याचा फटका बसला.

ठळक मुद्देगोसे, बावनथडी प्रकल्पाचे दरवाजे उघडले । अनेक मार्ग बंद, नदी तीरावरील गावात हाहाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संततधार पावसाने विश्रांती घेतली असली तरी वैनगंगा आणि बावनथडी प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाली आहे. तुमसर, मोहाडी, भंडारा आणि पवनी तालुक्यातील नदी तीरावरील गावांमध्ये पाणी शिरले असून अनेकांनी सुरक्षितस्थळी आश्रय घेतला आहे. अनेक मार्ग पुरामुळे बंद पडले आहे. भंडारा शहरातील काही वसाहतीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना नावेच्या सहायाने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.भंडारा जिल्ह्यात गत २४ तासात ६६.९ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात १०२ मिमी नोंदविला गेला. भंडारा ७४.३, मोहाडी ८५.३, पवनी २०.६, साकोली ८०, लाखांदूर २८.३, लाखनी ७८ मिमी पावसाची नोंद झाली. २४ तास अविश्रांत झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय झाला आहे. भंडारा शहरासह तालुक्यातील १९ गावांना पूराचा पाण्याचा फटका बसला. शहरातील ग्रामसेवक कॉलनी, गणेशनगरी यासह तालुक्यातील गणेशपूर, जुनी पिंपरी, दवडीपार बेला, कोथूर्णा आदी गावात पूराचे पाणी शिरले. शहरातील ग्रामसेवक कॉलनीतील ५८ घरात तीन फुट पाणी असून या भागातील नागरिक भयभीत झाले आहे.तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. गत २४ तासात या धरणामध्ये विक्रमी ८०१ क्युमेक्स पाण्याचा संचय झाला. तसेच धरण परिसरात ११६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. परिणामी तुमसर तालुक्यातील अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली. ब्राम्हणी आणि बोरी, उमरवाडा, कोष्टी, माडगी, ढोरवाडा गावात पाणी शिरले. बोरी येथे २५० एकर धान पीक पाण्याखाली आले आहे. तामसवाडी गावाला बेटाचे स्वरूप आले आहे. तामसवाडी येथील गावेर्धन नगरातील हरीप्रसाद रावते यांचे घर पावसामुळे कोसळले. मात्र जीवितहानी झाली नाही. लाखांदूर तालुक्यात चुलबंद नदीला तिसऱ्यांदा पूर आला. त्यामुळे शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली आले आहे. मोहाडी तालुक्यालाही पुराचा फटका बसला असून मुंढरी ते कोका दरम्यान पुलाच्या बांधकामामुळे खडकी गावाला पुराचा फटका बसला. गोसे प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यात सात दरवाजे चार मीटरने तर २६ दरवाजे ३.५ मीटरने उघडण्यात आले. या प्रकल्पातून २३ हजार ३८३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.अनेक मार्ग बंदपूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडले आहेत. बावनथडी नदीला पूर आल्याने बपेरा गावाजवळील पूलावरून चार फुट पाणी वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेश आंतरराज्यीय वाहतूक बंद झाली आहे. बोडीतेला, बिनाखी, सिंदपुरी, चुल्हाड, सिलेगाव, परसवाडा, सुकळी-देवसर्री, रनेरा-सिलेगाव या गावांचा ही संपर्क तुटला. पुलावरून पाच फुट पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे. मोहाडी तालुक्यातील वडेगाव, आंधळगाव मार्गासह करडी मार्गावरील उसरीपार पुलावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. भंडारा शहरालगत असलेल्या कारधा लहान पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने हा रस्ता बंद करण्यात आला. भंडारा-तुमसर या मार्गावरील भंडारालगत मेहंदी पुलावरून सायंकाळी पाणी वाहत असल्याने हा रस्ताही बंद झाला. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारालगतच्या मोठ्या पुलावर सायंकाळी ट्रक उलटल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.भंडारा जिल्ह्यातील पूरपस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहो. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली आहे. नुकसानग्रस्तांना अधिकाअधिक मदत देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. माजी आमदार राजेंद्र जैन पूरग्रस्त गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे. पूरग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत मिळावी यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाईल.-प्रफुल पटेल, खासदार

टॅग्स :floodपूरRainपाऊस