शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाऊस मुक्कामी; धान पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 21:46 IST

भंडारा जिल्ह्याची वार्षिक सरासरी ११६४.७ मिलीमीटर आहे. यावर्षी आतापर्यंत १५८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत १२१ टक्के पाऊस कोसळला आहे. वार्षिक सरासरीच्या २१ टक्के पाऊस अधिक कोसळला आहे. दरवर्षी साधारणत: ५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस परत जातो. मात्र, यंदा दररोज जिल्ह्यात कुठे ना कुठे पाऊस कोसळत आहे. सोमवारी रात्री भंडारा शहरासह जिल्ह्यात अपवाद वगळता सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साधारणत: ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परत जाणारा पाऊस अद्यापही मुक्कामी असल्याने संपूर्ण धानपीक पाण्याखाली आले आहे. दररोज कोसळणाऱ्या पावसाने कापणीची कामे खोळंबली आहेत. दिवाळीच्या पर्वात पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.भंडारा जिल्ह्याची वार्षिक सरासरी ११६४.७ मिलीमीटर आहे. यावर्षी आतापर्यंत १५८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत १२१ टक्के पाऊस कोसळला आहे. वार्षिक सरासरीच्या २१ टक्के पाऊस अधिक कोसळला आहे. दरवर्षी साधारणत: ५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस परत जातो. मात्र, यंदा दररोज जिल्ह्यात कुठे ना कुठे पाऊस कोसळत आहे. सोमवारी रात्री भंडारा शहरासह जिल्ह्यात अपवाद वगळता सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. भंडारा तालुक्यात गत २४ तासांत १०.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर लाखनी तालुक्यात ४६.६ मिलीमीटर पाऊस कोसळला. पवनी १.२ मिलीमीटर, साकोली २.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात सध्या हलक्या प्रतीचा धान कापणीला आला आहे. शेतकरी दिवाळीपूर्वी कापणी करून विक्रीच्या तयारीत आहे. मात्र, अद्याप पाऊस थांबायचे नाव घेत नाही. दररोज पाऊस कोसळत असल्याने कापणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. कापणी झालेल्या धानाच्या कडपा पावसात ओल्या होत आहेत. बांधीत अद्यापही पाणी साचून असल्याने कापणी करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. शेतात आजही सर्वत्र पाणी दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५८८ मिमी पाऊस कोसळला आहे. तो वार्षिक सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक आहे. सर्वाधिक पाऊस मोहाडी तालुक्यात १७२६.८ मिमी कोसळला आहे. हा तालुक्याच्या सरासरीच्या १३९ टक्के आहे. तर तुमसर तालुक्यात १७१४.४ मिमी पाऊस कोसळला असून वार्षिक सरासरीच्या १३८ टक्के आहे. भंडारा तालुक्यात १६३३.८ मिमी, पवनी १४२७.२ मिमी, साकोली १६२०.४ मिमी, लाखांदूर १६००.२ मिमी, लाखनी १३९३.३ मिमी पाऊस कोसळला आहे. १ जून ते १८ ऑक्टोबरपर्यंत १३०९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, त्यापेक्षा अधिक पाऊस कोसळला असून अद्यापही पाऊस थांबायचे नाव नाही.

नऊ वर्षांपूर्वी नोव्हेंबरपर्यंत कोसळला पाऊससध्या दररोज कोसळणाऱ्या पावसाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. मात्र, अशीच स्थिती २०१३ मध्ये झाली होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस कोसळत होता. या पावसाने त्याही वेळी मोठे नुकसान झाले होते. यंदाही तशीच स्थिती निर्माण झाली असून, दररोज पाऊस कोसळत आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्याला यलो अलर्ट- हवामान खात्याने जिल्ह्याला पुन्हा यलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर १९ ते २२ ऑक्टोबरपर्यंत इशारा दिला नाही. परंतु, यंदा हवामान खात्याचा अंदाज चुकवत दररोज पाऊस कोसळत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस