बावनथडी वितरिकेच्या कामाला रेल्वेचा ‘खो’
By Admin | Updated: May 6, 2015 00:47 IST2015-05-06T00:47:12+5:302015-05-06T00:47:12+5:30
मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅक खालून वितरिकेच्या कामांना रेल्वेने मंजूरी न दिल्याने देव्हाडी परिसरातील अनेक गावे सिंचनापासून वंचित ..

बावनथडी वितरिकेच्या कामाला रेल्वेचा ‘खो’
विभागाचे दुर्लक्ष : अनेक गावे सिंचनापासून वंचित
मोहन भोयर तुमसर
मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅक खालून वितरिकेच्या कामांना रेल्वेने मंजूरी न दिल्याने देव्हाडी परिसरातील अनेक गावे सिंचनापासून वंचित आहे. वितरीकेचे गाळे तयार करण्याकरिता संबंधित विभागसुध्दा दुर्लक्ष करीत असल्याचे समजते.
तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. सन २०१२-१३ मध्ये तुमसर व मोहाडी तालुक्यातील काही गावांना प्रकल्पातून सिंचनाकरिता पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. अनेक गावात वितरीकेची कामे रखडली आहेत. देव्हाडी परिसरात रेल्वे ट्रक छेदून मुख्य वितरिका पलीकडे नेण्याकरिता रेल्वे प्रशासनाने मंजूरी दिली नाही. मुख्य वितरिकेचे काम रखडले आहे.
मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर पलीकडे मुख्य वितरीकेच्या कामाला रेल्वे प्रशासनाने ‘खो’ दिला आहे. रेल्वे ट्रक पलीकडे २० ते २५ गावे यामुळे सिचंनापासून वंचित आहेत. देव्हाडी-माडगी सिवनी शिवारात रेल्वे ट्रॅकपर्यंत दोन्ही बाजूचे बहुतांश प्रकल्पाची कामे झाली आहेत. रेल्वे ट्रॅकपर्यंत येऊन ती थांबली आहे.
बावनथडी प्रकल्प अधिका-यांचे येथे नियोजनही चुकल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. वितरिका जेथून रेल्वे ट्रॅक खालून जाण्याचे निश्चित करण्यात आले. त्या स्थळापासून १०० ते १५० मीटर अंतरावर एक मोठा नाला आहे. या नाल्याखालून मोठया जलवाहिन्या घालून वितरीकेत पुढे पाणी सोडले जाऊ शकत होते.
१०० ते १५० मीटर अंतरावर रेल्वे ट्रक खालून वितरिका कामाला मंजूरी देण्यात येऊ शकते काय? याचा विचार रेल्वे प्रशासन करीत असल्याचे समजते.
गोसेखुर्द प्रकल्प बांधकामाची सध्या चौकशी सुरु आहे. बावनथडी प्रकल्प सुमारे ३५ वर्षांपुर्वी सुरु झाला होता. निधी अभावी हा प्रकल्प रखडत गेला. संपूर्ण बावनथडी प्रकल्पाच्या बांधकामावर लक्ष घातल्यास विना महत्वाची कामे आधी करण्यात आली. यात मलाईदार कामांचा समावेश आहे. रस्त्यावरील पूल, लहान वितरिीेवरील गेट, पुलाचा समावेश आहे.
आदिवासी मंत्र्यांना निवेदन
लेंडेझरी येथे सोमवारी आदिवासी बांधवांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राज्याचे आदीवासी राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम उपस्थित होते. परिसरातील प्रकल्पग्रस्त बांधवानी जमिनीच्या मोबदला व पुर्नवसनबाबद मंत्र्यांना निवेदन दिले. ना. आत्राम यांनी जिल्हाधिकारी व संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.