राधाकृष्ण संघ ठरला अव्वल
By Admin | Updated: October 3, 2014 01:14 IST2014-10-03T01:14:27+5:302014-10-03T01:14:27+5:30
लोकमत सखी मंचतर्फे नवरात्र पर्वावर स्थानिक म्हाडा कॉलनीत जिल्हास्तरीय धमाल दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

राधाकृष्ण संघ ठरला अव्वल
भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे नवरात्र पर्वावर स्थानिक म्हाडा कॉलनीत जिल्हास्तरीय धमाल दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भंडारा येथील राधाकृष्ण ग्रुपने बाजी मारली. विजयी संघांना स्मृतीचिन्ह, रोख बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत जिल्हाभरातून संघांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात दुर्गा मातेची आरती आणि दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विविध संघाने नृत्य सादर केले. या नृत्यांनी उपस्थित प्रेक्षकांना आकर्षित केले. स्पर्धेत भंडारा येथील राधाकृष्ण संघ प्रथम, मोहाडीतील साईताज संघ द्वितीय तर तृतीय क्रमांकाकरिता संघम संघ व श्रद्धा सबुरी संघ यांना संयुक्तरित्या निवडण्यात आले. स्पर्धेचे गुणानुक्रम नृत्य प्रदर्शन, मंच वापर, गाण्याची निवड, वेशभूषा, सामाजिक संदेश, सादरीकरण, स्फूर्ती नियम आणि अटींची पूर्तता यांचा समावेश करण्यात आला होता. स्पर्धा परिक्षणाकरिता अमरावती येथील आनंद गजभिये व नरेंद्र भुयार यांनी जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाला सदानंद निपाने, नितीन धकाते, वर्षा गौपाले डॉ.अनिल कुर्वे, जयेश वनेरकर यांचे सहकार्य लाभले. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या व सहभागी सर्व स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, रोख बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्णून विलास शेंडे व त्रिमूर्ती दांडिया संघाचे पदाधिकारी मोनू गोस्वामी, विजय पडोळे, समीर सूर्यवंशी, देवा वैरागडे, पिंटू हर्षे, गोलू शेंदरे व रमेश हजारे यांनी सहकार्य केले.
स्पर्धेबद्दल दर्शकांमधून विक्रम फडके यांनी मनोगत व्यक्त केले.
वॉर्ड संयोजिका हर्षा रक्षिसे, मनिषा रक्षिसे, कल्पना डांगरे व अंजू पिपरेवार, युवा प्रतिनिधी लतीशा खोत, शरयू टाकळकर, सागर जोशी, योगेश लांजेवार, मोइन काझी, योगेश पडोळे, सोनाली शेंडे, पराग बंधाटे, सुधाकर गोन्नाडे, रमेश सेलोकर व सतीश नंदनवार यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे, स्नेहा वरखडे, प्रास्ताविक व आभार जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी मानले. युवा नेक्स्ट जिल्हा संयोजिका ग्रिष्मा खोत यांनी आगामी येणाऱ्या सदस्य नोंदणी व वार्षिक उपक्रमाविषयी सदस्यांना माहिती दिली. (मंच प्रतिनिधी)