माेहाडीत एलसीबी पथकावर राॅडने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:15+5:302021-04-24T04:36:15+5:30
भंडारा : बहुचर्चित रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराची चाैकशी करुन संशयितांची पडताळणी करण्यासाठी गेलेल्या येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर लाेखंडी राॅडने ...

माेहाडीत एलसीबी पथकावर राॅडने हल्ला
भंडारा : बहुचर्चित रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराची चाैकशी करुन संशयितांची पडताळणी करण्यासाठी गेलेल्या येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर लाेखंडी राॅडने हल्ला करण्याची घटना माेहाडी येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल न्यायखाेर (४०), प्रकाश न्यायखाेर (३५) (दाेघे रा. डाेंगरगाव, हल्ली रा. माेहाडी), विष्णू गाेमासे (३५, रा. पारडी) अशी आराेपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर पथकासह खासगी वाहनाने माेहाडी येथे गुरुवारी गेले हाेते. तहसील कार्यालयासमाेर विदर्भ टायर्स वर्क्स दुकानाच्या बाजूला ते चाैकशी करत हाेते. त्यावेळी तिघेही तेथे आले व तुम्ही येथे कारवाई करायची नाही, असे पाेलिसांनाच बजावू लागले. तेवढ्यात विष्णू गाेमासे हा हातात लाेखंडी राॅड घेऊन शिवीगाळ करु लागला व रेवतकर यांना मारण्यासाठी धावला. त्यावेळी साेबत असलेले पाेलीस हवालदार तुळशीदास माेहरकर यांनी त्याला अडवले. मात्र, या झटापटीत त्यांच्या हाताला जबर मुका मार लागला. तसेच अनिल न्यायखाेर व प्रकाश न्यायखाेर या दाेघांनी त्यांना मारहाण केली.
या प्रकाराने काही काळ गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले हाेते. अखेर रवींद्र रेवतकर यांनी माेहाडी पाेलीस ठाण्यात सायंकाळी तक्रार दाखल केली. त्यावरुन तिघांविरुध्द भांदवि ३५३, ३३२, २९४ आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती. अधिक तपास परिविक्षाधिन पाेलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
इंजेक्शन काळा बाजाराचे गाैडबंगाल
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळा बाजाराची माहिती मिळाल्याने माेहाडी येथे गेले हाेते. तेथे चाैकशी करत हाेते. मात्र, अचानक या तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे याठिकाणी रेमडेसिविर आढळले की नाही, नेमका काय प्रकार आहे, याबाबत माेहाडी येथे उलटसुलट चर्चा सुरु आहे. माेहाडीत रेमडेसिविरच्या इंजेक्शनचा काळाबाजार हाेतो का? या तिघांचा या प्रकरणाशी काय संबंध, या तिघांनी अचानक पाेलिसांवर का हल्ला केला. या प्रकाराची चाैकशी केल्यास काळा बाजाराचे धागेदाेरे बाहेर येण्याची शक्यता आहे.