शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:51 IST2019-06-03T00:50:58+5:302019-06-03T00:51:32+5:30
उन्हाळी धान पिकाकरिता शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याकरिता शासनाने धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. पंरतु शेतकऱ्यांचे धान खरेदी न करता प्रथम शासनाचे धान खरेदी करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे धान खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : उन्हाळी धान पिकाकरिता शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याकरिता शासनाने धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. पंरतु शेतकऱ्यांचे धान खरेदी न करता प्रथम शासनाचे धान खरेदी करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आहे. तुमसर तालुक्यातील वाहनी येथे शेतकऱ्यांची शेकडो धान पोती खरेदी केंद्रावर पडून असून वांगी येथे व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे तथा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांकडून केली आहे.
तुमसर तालुका धानाचे कोठार म्हणून प्रसिध्द आहे. सिहोरा परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांची लुट होऊ नये व शासकीय दराप्रमाणे शेतकºयांना धानाचा भाव मिळावा याकरिता धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. सदर केंद्रावर शासकीय नियमानुसार शेतकऱ्यांकडे धान खरेदी करण्याचा कायदा आहे,परंतु वाहनी धान खरेदी केंद्रावर शेकडो धानाची पोती पडून असतांना त्यांची मोजणी करण्यात आली नाही. उलट वांगी येथे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात धान खरेदी करणे सुरु आहे.
वाहनी केंद्रावर इलेक्ट्रानिक काट्याने धानाची मोजण्ीा होत नाही. तर साधा वजनमाप काट्यावर धानाची मोजणी केली जात आहे. त्यामुळे मोजणीत शेतकऱ्यांची लुट होत आहे. वाहनी धान खरेदी केंद्रावर शेतकºयांची आकस्मिक पाऊस आल्यास धान ओले होऊन नुकसान होऊ नये म्हणून धान पोती प्लास्टीकने झाकून ठेवली आहे.
पावसाळ्याची चाहुल लागली असून वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता बळावली आहे. अशातच धान ओले झाले तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी भंडारा येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी पं.स. सदस्य हिरालाल नागपूरे यांनी भ्रमणध्वनीवर संपर्कसाधला असता त्यांचा फोन बंद होता, असे तक्रारीत नमुद केले आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासणार की व्यापाऱ्यांचे हित जोपासणार आहे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी येथे उपस्थित केला आहे.
वाहनी येथील धान खरेदी केंद्रावरील सुरु असलेला सावळागोंधळाची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी नागपूर यांनी केली आहे. येत्या दोन दिवसात वाहनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करणे सुरु न केल्यास शेतकºयांसोबत आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य हिराला नागपूरे यांनी दिला आहे.
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र लुट केंद्र आहे काय? येथे शेतकऱ्यांचे धान खरेदी न करता व्यापाºयांचे धान खरेदी करणे नियमबाह्यपणे सुरु आहे. जिल्हास्तरावरील संबंधित अधिकारी मुग गिळून गप्प आहेत. असा अन्याय कदापी खपवून घेणार नाही.
- हिरालाल नागपूरे
पंचायत समिती सदस्य सिलेगाव