डाळींनी बिघडविले गृहबजेट
By Admin | Updated: April 4, 2015 00:12 IST2015-04-04T00:12:45+5:302015-04-04T00:12:45+5:30
दररोजच्या आहारात वरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु डाळींच्या किमती गगनाला भिडल्याने गृहिणी हैराण झाल्या आहेत.

डाळींनी बिघडविले गृहबजेट
भंडारा : दररोजच्या आहारात वरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु डाळींच्या किमती गगनाला भिडल्याने गृहिणी हैराण झाल्या आहेत. तुरीची डाळ महागल्याने ती पुरवून-पुरवून वापरण्यासाठी गृहिणींना मोठी कसरत करावी लागत आहे. सोबतच उडद, मूग व चनाडाळही महागल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रीय जेवणात वरण, भात भाजी पोळी असा नेहमीचा स्वयंपाक केला जातो. जेवण कोरडे वाटू नये तसेच जेवणात प्रथिनांचा समावेश व्हावा यासाठी तुरीच्या डाळीच्या वरणात जास्त महत्त्व आहे. सोबतच पालकभाजी व इतरही भाज्यांमध्ये तूर व चनाडाळ मोठ्या प्रमाणात वापरली जाते. यामुळे या डाळींची मागणी जास्त असते. सोबतच उडद व मुगाची डाळ जेवणात असतेच. परंतु दोन वर्षांपासून डाळींच्या किमती वाढल्यामुळे रोजच्या आहारात डाळींचा समावेश करताना गृहिणींना नाकीनऊ येत आहे. मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसाने तुरीच्या डाळीचे उत्पन्न घटत चालले. हाच प्रकार चना डाळीसोबतही पहावयास मिळतो. सध्या तूर डाळ ८८ रु पये, उडद ८६, मुगडाळ ९० ते शंभर, चनाडाळ ८० ते ९० असे भाव पाहून गृहिणींच्या डोळात पाणी येत आहेत. जिल्ह्यात तूर व हरभऱ्याचे उत्पन्न घेतल्या जाते. त्यामुळे ग्रामीण भागात किमान खाण्यापुरती दाळ मिळून जाते. शहरात असलेल्या नागरिकांना मात्र सर्व पदार्थ विकत घ्यावे लागतात. तसेच उडद व मुगाच्या डाळीचे उत्पन्न जिल्ह्यात नगन्य आहे. दाक्षिणात्य पदार्थांची क्रेझ वाढल्यामुळे या डाळीचे प्रमाण वाढले आहे. आहारातून पौष्ठिकत्व कमी होत असल्यामुळे डॉक्टर जेवणामध्ये डाळींचा उपयोग करण्याचा सल्ला देतात. सर्वच डाळींचा समावेश आहारात असावे असे डॉक्टर सांगतात. परंतु किमती महागल्याने त्यांचा आहारात नियमित उपयोग कसा करावा असा प्रश्न पडतो. त्यामुळे शासनाने डाळींच्या किमती स्थिर ठेवण्याची मागणी गृहिणींमधून होत आहे. (नगर प्रतिनिधी)
घरच्या डाळींची मागणी जास्त
बाजारात सर्वच डाळी उपलब्ध असल्या तरी गावांमध्ये उत्पादित होत असलेल्या घरच्या डाळीची मागणी ही जास्त आहे. अशी डाळ थोड्या जास्त किमतीतही घ्यायला शहरातील नागरिक तयार असतात.
बाजारात मिळत असलेली तुरीची दाळ ही जास्त पिवळी व चमकदार असली तरी ती पॉलिश केलेली असते हे नागरिकांना आता कळून चुकले आहे. त्यामुळे घरगुती डाळीला जास्त मागणी आहे. आहाराबाबत नागरिक जागरूक झाल्याने प्रत्येक गोष्ट पारखून घेण्याकडे कल असतो. आहारात सर्वत्र डाळींचा समावेश आवश्यक
तूर आणि चणाडाळीच्या तुलनेत आहारात बाकी डाळींचा समावेश हा फार अत्यल्प असतो. त्यामुळे दोनच डाळीची मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमती गगनाला भिडतात. पण यावर पर्याय म्हणून मिक्स डाळींचे वरण जेवणात असावे असा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात.
सर्वच डाळींचा आहारात सारखा समावेश असल्यास प्रथिनेही भरपूर प्रमाणात मिळतात आण िमहागाईपासून थोडा दिलासा मिळत असतो. त्यामुळे गृहिणींने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.