पोलीस विभागातर्फे जनजागरण मोहीम
By Admin | Updated: June 28, 2014 23:27 IST2014-06-28T23:27:13+5:302014-06-28T23:27:13+5:30
देशात सध्या दहशतवादी हल्ले, अतिरेकी कारवाया सुरू असून यामध्ये कित्येक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. यासाठी यावर आळा घालण्यासाठी लोकांना जागृत करण्याची अत्यंत आवश्यकता असून

पोलीस विभागातर्फे जनजागरण मोहीम
भंडारा : देशात सध्या दहशतवादी हल्ले, अतिरेकी कारवाया सुरू असून यामध्ये कित्येक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. यासाठी यावर आळा घालण्यासाठी लोकांना जागृत करण्याची अत्यंत आवश्यकता असून त्यासाठी जनजागरण मोहिम पोलीस विभागामार्फत सुरू झाली आहे.
यासाठी दहशतवादी हल्ले, अतिरेकी कारवाया, भीषण दंगली आदीवर आळा घालण्यासाठी भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अतिआवश्यक पोस्टर्स बनवून सदर पोस्टर्स राज्य परिवहन विभागाच्या वाहनात, आॅटोरिक्षात, शाळेतील वाहनात लावण्यात आलेले असून जनतेसाठी घ्यावयाची खबरदारी बाबतच्या सूचना लावण्यात आलेले पोस्टर्स तयार करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील जनतेने सूचनांचे खबरदारी बाळगून सतर्कता बाळगावी, असे जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)
करडीत कृषी सहायकाची मागणी
करडी : करडी येथे अनेक दिवसांपासून कृषी सहायकाचे पद रिक्त आहे. प्रभार पालोरा येथील कृषी सहायकाकडे सोपविण्यात आला असला तरी त्यांचीही बदली झालेली आहे. खरीप हंगाम सुरू झालेला असताना शेतकऱ्यांना सहायकाअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्वरित कृषी सहायकाचे पद भरण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निशिकांत इलमे व गावकऱ्यांनी केली आहे.
करडी हे पाच हजार लोकसंख्येचे गाव असून गावात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातही नावीन्यपूर्ण शेतीत प्रयोग करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र शेतीसाठी मार्गदर्शन करणारा कृषी सहायकच गावात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पद रिक्त आहे. पालोरा येथील कृषी सहायकच गावात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पद रिक्त आहे.
पालोरा येथील कृषी सहायकाकडे प्रभार देण्यात आला असला तरी त्यांचीही बदली झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्या भेडसावत आहेत. खते, बी-बियाणे, माती परीक्षण, नांगरटी व पेरणीची पद्धत, लागवडीचे तंत्र यासंबंधीच्या मार्गदर्शनाची उणीव भासत आहे. त्वरित कृषी सहाय्यकाचे पद भरण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निशिकांत इलमे, मंगेश साठवणे, सोपान डाकरे, अमोल ढबाले, प्रकाश गाढवे व नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)