लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. कृषीच्या माध्यमातून या देशाची अर्थव्यवस्था उभी राहू शकते. खरीप हंगामाच्या मुहूर्तावर पीक कर्जासाठी नियमांचे पालन करून जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांना फास्टट्रॅक मोडवर कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. पीक कर्ज वाटपासाठी महसूल, कृषी व बँक सखी असा टास्कफोर्स तयार करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सभागृहात शुक्रवारी विविध विषयाचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.खरीपासाठी पीक कर्ज वितरणाचा ४२६ कोटी २५ लाख रुपये एवढा लक्षांक जिल्ह्याला प्राप्त आहे. त्यापैकी ४८ हजार २४७ सभासदांना २३९ कोटी ६७ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले. पीक कर्ज ३० जूनपर्यंत वितरित करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला. महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत भंडारा जिल्ह्यात ३१ हजार ४२१ सभासदापैकी २२ हजार ४२८ तपासणी झाली आहे. २० हजार १३७ सभासदांना वितरित करण्यासाठी १०७ कोटी ४० लाख रुपये प्राप्त झाले असून ते खात्यावर जमा करण्यात आले आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ३ हजार ८७ सभासदांकडून ३२ लाख १० हजार ८०२ क्विंटल धान खरेदी केली. रबी हंगामात ९५ केंद्रावर आजपर्यंत ६ हजार १७७ शेतकºयांकडून २ लाख ४३ हजार ४४८ क्विंटल धान खरेदी करण्यात आले.
शेतकऱ्यांना 'फास्टट्रॅक' मोडवर पीककर्ज उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST
खरीपासाठी पीक कर्ज वितरणाचा ४२६ कोटी २५ लाख रुपये एवढा लक्षांक जिल्ह्याला प्राप्त आहे. त्यापैकी ४८ हजार २४७ सभासदांना २३९ कोटी ६७ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले. पीक कर्ज ३० जूनपर्यंत वितरित करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला.
शेतकऱ्यांना 'फास्टट्रॅक' मोडवर पीककर्ज उपलब्ध करून द्या
ठळक मुद्देपालकमंत्री : ३० जूनपर्यंत पीक कर्ज वितरित करा