पीक नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 06:00 AM2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:00:58+5:30

मागील पाच-सहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस पडला. त्यामुळे धानपिकांची अवस्था चांगली होती. हलके धान पिक कापणी होऊन पावसामुळे १५ ते २० दिवसापासून शेतातच आहेत. अनेक शेतकºयांच्या शेतात धानपिक अंकुरले आहेत. मध्यम व जड जातीचे धान निसण्याच्या मार्गावर आहेत. मात्र परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने शेतातील धानपिक आडवे पडले आहे.

Provide financial assistance through crop loss | पीक नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या

पीक नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची आर्त हाक : नाकाडोंगरी, गोबरवाही, डोंगरी, गर्रा बघेडा येथे अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील नाकाडोंगरी, गोबरवाही, डोंगरी बु, गर्रा बघेडा या परीसरात धान पीक चांगल्या अवस्थेत असतानाच परतीच्या पावसामुळे धान शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. बळीराजा हवालदिल झालेला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील पाच-सहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस पडला. त्यामुळे धानपिकांची अवस्था चांगली होती. हलके धान पिक कापणी होऊन पावसामुळे १५ ते २० दिवसापासून शेतातच आहेत. अनेक शेतकºयांच्या शेतात धानपिक अंकुरले आहेत. मध्यम व जड जातीचे धान निसण्याच्या मार्गावर आहेत. मात्र परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने शेतातील धानपिक आडवे पडले आहे. कापलेल्या धानाच्या कडपा पाण्यात भिजुन गेल्या.
या अवकाळी आलेल्या पावसामूळे व किडींचा प्रादुभार्वा मुळे शेतकºयांच्या शेकडो हेक्टर जमिनीतील धान पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे.
त्या पीक विमा कंपनीने तात्काळ या शेतकºयांच्या धान पिकांची चौकशी करून त्यांना तात्काळ नुकसानीच्या आधारावर पीक विम्याची रक्कम सुध्दा राज्य शासनाकडून तत्काळ मंजूर करण्यात यावी.
याशिवाय अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे सर्वे करून तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या सोयी सुविधा संपूर्ण तुमसर तालुक्यातील शेतकºयांना देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील सर्व शेतकरी वगार्तून होत आहे.

संबंधित यंत्रणेने सदर बाबींची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून शेतकºयांना आर्थिक मदत व पिकविम्याचा लाभ द्यावा.
-श्याम बिसेन, युवा शेतकरी डोंगरी (बूज).
अवकाळी पाऊस व किडींचा प्रादुभार्वाने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असताना केंद्र व राज्य सरकारने कोणतेही दखल घेतली नाही तात्काळ शेतकºयांना मदत न पुरविल्यास मोठे आंदोलन केले जाईल.
-ठाकचंद मुंगूसमारे, रा.यु.का.तालुका अध्यक्ष.

Web Title: Provide financial assistance through crop loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.