मानस साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. एखाद्या वेळी लहान-मोठी दुर्घटना घडली तर त्याकरिता साधी प्रथमोपचार सुविधासुद्धा उपलब्ध नाही. ८ डिसेंबर २०२० ला प्रेमलाल पटले व राधा प्रसाद हे दोन कर्मचारी खलासी युनिटमध्ये काम करत असताना उसाच्या रसाचा पाईप फाटल्याने ते गंभीररीत्या भाजले गेले तसेच २ जानेवारीला योगेश भोयर याचे हात भाजले गेले. काही दिवसांपूर्वी पवन लाळे, संदीप बागडे यांचे ॲसिडयुक्त पाण्याने अंग भाजले गेले होते; परंतु कारखान्यातर्फे त्यांना एक रुपयाचीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही.
बॉयलरच्या भट्टीमध्ये कोळसा किंवा लाकूड जाळायला हवे, परंतु बायलरच्या भट्टीमध्ये उसाचे चिपाड जाळण्यात येते तसेच कारखान्याचे दूषित निकामी पाणी चोरखमारा नहरात सोडले जात आहे आणि नहरातून हे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले. याची तक्रार प्रदूषण अधिकाऱ्यांना करण्यात आल्यानंतरही त्यांनी कोणत्याच प्रकारची चौकशी केलेली नाही.