पालिकेसमोर डफऱ्या व बेशरमची झाडे लावून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:15 IST2021-09-02T05:15:28+5:302021-09-02T05:15:28+5:30
०१ लोक ०२ तुमसर : नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे तुमसरकरांच्या मनोरंजनाकरिता बांधण्यात आलेला एकमेव गांधीसागर उद्यान अखेरची घटका मोजत ...

पालिकेसमोर डफऱ्या व बेशरमची झाडे लावून निषेध
०१ लोक ०२
तुमसर : नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे तुमसरकरांच्या मनोरंजनाकरिता बांधण्यात आलेला एकमेव गांधीसागर उद्यान अखेरची घटका मोजत आहे. उद्यान सुरू व्हावे यासाठी राष्ट्रवादीतर्फे निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला होता. मात्र १५ दिवस लोटूनही कोणतीही कारवाई झाली नाही. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बुधवारी नगर परिषदेच्या गेटसमोर डफऱ्या वाजवून व बेशरमची झाडे लावून न.प. प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाने तुमसरकरांचे लक्ष वेधले.
कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या गांधीसागर उद्यान हे नगर पालिका प्रशासन व अध्यक्षांच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची स्थिती बिकट झाली आहे. या गांधी सागर उद्यानात चहूबाजूंनी रानगवत उगवलेले आहे. मौल्यवान झाडे जमीनदोस्त झाली आहेत. चोहीकडे घाण आणि घाणच दिसून येते एकंदरीत उद्यान मरणासन्न अवस्थेत आहे.
१५ दिवसांत उद्यानाला पुनर्जीवित करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, या मागणीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र १५ दिवस लोटूनही उद्यान सुरु करण्यासंबंधी कोणतीही कारवाई झाली नसल्याने अखेर आज तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने तुमसर नगर परिषदसमोर डफऱ्या व बेशरमीची झाडे ठेवून न. प. प्रशासन व नगराध्यक्ष यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी तुमसर शहर रायुकाँ अध्यक्ष सुनील थोटे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष प्रदीप भरनेकर, सुमित मलेवार, गोवर्धन किरपाने, मयूर मेश्राम, करण जौहर, संकेत गजभिये, प्रतीक निखाडे, मारुती समरीत,आयुष बारई,मुकेश मलेवार व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.