पर्यावरणाचे संरक्षण म्हणजे मानवाचे संरक्षण
By Admin | Updated: June 4, 2014 23:30 IST2014-06-04T23:30:25+5:302014-06-04T23:30:25+5:30
भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणाचा भाव अति प्राचीन आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्गाला देवाचेच स्थान दिले होते. म्हणून ते निसर्गाबद्दल आदर बाळगत, झाडे, नद्या, डोंगर, प्राणी पशु, पक्षी या सर्वांनाच भारतीय

पर्यावरणाचे संरक्षण म्हणजे मानवाचे संरक्षण
भंडारा : भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणाचा भाव अति प्राचीन आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्गाला देवाचेच स्थान दिले होते. म्हणून ते निसर्गाबद्दल आदर बाळगत, झाडे, नद्या, डोंगर, प्राणी पशु, पक्षी या सर्वांनाच भारतीय संस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे.
वृक्षतोड, ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन, इंधनाचा अंधाधुंद वापर, सीमेंट काँक्रीटच्या जंगलामुळे जलस्तरावरील घट वन्यजीव पशू पक्ष्यांची अंधाधुंद शिकार, वाढते हवामान, वणवा आदींमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याने त्याचे शीघ्र संरक्षण करणे आवश्यक आहे. याबाबद ग्रीनहेरिटेज संस्थेतर्फे वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. विकासाच्या नावावर प्रकृतीशी छेडछाड केली जात आहे. ग्रामीण क्षेत्रात लोक हातात कुर्हाड घेऊन जंगलात जातात व डौलदार व हिरव्याकंच मौल्यवान झाडांची सर्रासपणे कत्तल करतात. रस्ता चौपदरीकरण, नहर बांधकाम, शहरीकरणामुळे मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीमुळे जंगलाची जंगले ओसाड होऊन पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. पशू पक्षी व वन्य जीवांची सर्रासपणे अवैध शिकार सुरु आहे. वाढत्या तापमान, वणवा, आगीमुळे जंगले भस्म होऊन वन्य प्राणी जंगले सोडून गाव शहराकडे धावत आहेत. तर काही पाण्याअभावी आपले जीवांशी मुकत आहेत. कचरा, घाण, सांडपाणी, दूषित जल जीवनदायी नद्यात टाकून आपणच त्यांना विषनद्या बनवून त्यांचे पावित्र्य संपवित आहोत.
बदलत्या हवामान चक्रामुळे पर्यावरण असंतुलनाचे परिणाम मानवाला भोगावे लागतील. तापमान वाढीमुळे नद्या, जलाशय आटत असल्यामुळे जमिनीखाली पाण्याची पातळी खोलवर जात आहे. त्यामुळे भविष्यात नद्या, जलाशय, पाण्याविना राहून जमिनीतील पाणीही अदृष्य होईल, तेव्हा मानवाचे काय हाल होईल याबाबत आतापासूनच याकडे गांभीर्याने नियोजन करण्याची गरज आहे. भविष्यात तीव्र तापमान वृद्धीमुळे जंगलचे जंगल, गवताच्या झोपड्या उष्णतेच्या तीव्रतेने पेटून उठतील. पाण्यासाठी युद्ध व मानवाला गाव शहर सोडून जलाशय, नद्या, समुद्राकाठी आश्रय घेण्याची वेळ येणार आहे.
ध्रुवीय प्रदेश व हिमालयातील बर्फ वितळून समुद्र व नद्यांचे जलस्तर वाढून महापूर व भरतीची शक्यता असून वनस्पती, अन्नधान्य, जलचर, वनचर, पशु पक्षी यांचेही अस्तित्व लोक पावण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण जगाचे वाळवंट होण्याची चिन्हे दिसत असून मानव २२ वे शतक पाहणार की नाही असा प्रश्न आहे.
अलीकडेच अमेरिका, चीन इत्यादी देशात महापूर, बर्फाचे तुफान, जापान येथे भयंकर भूकंप व सुनामीमुळे अतोनात मनुष्यहानी, संपूर्ण युरोपखंडाच्या खाली खदखदत्या ज्वालामुखी शिवाय जगात काही ठिकाणी जागृत ज्वालामुखीमुळे लाखो हेक्टर जंगले आगीत भस्म, काही ठिकाणी भूकंप इ. घटनांनी महाविनाशलीलेची घंटा वाजविलेली आहे. जगात पर्यावरण संरक्षणाकरिता प्रयत्न सुरु आहे. पण आपणही पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता का हातभार लावू नये. विकासाची फळे पर्यावरणाची बळी देवून जर चाखायची असतील तर येणार्या पिढींसाठी देण्याकरिता आपल्यापाशी काहीच उरणार नही. प्रत्येक क्षेत्रातील गाव व शहरातील प्रत्येक नागरिकांनी जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे जतन व संरक्षण करणे, पशुपक्षी, वन्यजीव, जल इत्यादींच्या संरक्षणाची जबाबदारी उचलणे आवश्यक आहे. जल, जंगल, जमीन व वन्यजीव संरक्षण करून मानवही आपले संरक्षण करू शकेल. विश्व पर्यावरण दिवस (५ जून) निमित्त सर्वांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेऊन हातभार लावावे, असे आवाहन ग्रीेन हेरिटेज संस्थेतर्फे करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)