विषाणूजन्य आजारापासून स्वत:ला सांभाळा

By Admin | Updated: September 10, 2014 23:26 IST2014-09-10T23:26:55+5:302014-09-10T23:26:55+5:30

वातावरणात होणाऱ्या बदलामुळे तसेच उशिरा आलेले मान्सून आणि अनुकूल अशी आद्रता यामुळे डासांची उत्पत्ती वाढलेली आहे. त्यामुळे विषाणुजन्य तापाची वाढ झालेली आहे. जिल्ह्यात एप्रिलपासून

Protect yourself from viral illness | विषाणूजन्य आजारापासून स्वत:ला सांभाळा

विषाणूजन्य आजारापासून स्वत:ला सांभाळा

भंडारा : वातावरणात होणाऱ्या बदलामुळे तसेच उशिरा आलेले मान्सून आणि अनुकूल अशी आद्रता यामुळे डासांची उत्पत्ती वाढलेली आहे. त्यामुळे विषाणुजन्य तापाची वाढ झालेली आहे. जिल्ह्यात एप्रिलपासून आतापर्यंत डेंग्यू आजाराच्या विषाणूची तपासणीकरिता ३४२ रक्त जल नमुने इंदिरा गांधी मेडीकल कॉलेज नागपूर (मेयो) येथे पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १५३ रक्तजल नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी फक्त ३८ रुग्णांचे डेंग्यू दुषित रक्त नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला आहे व इतर रक्त नमुने निगेटीव्ह आढळले आहेत. एप्रिलपासून आतापर्यंत एकच रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. यापैकी विभागीय मृत्यूसंशोधन समिती नागपूर येथे निश्चित निदानाकरिता ६ रुग्णांचा अहवाल ठेवले असता सदर समितीने १ रुग्ण डेंग्यू आजाराने मृत्यू झाला असे निश्चित निदान केले.
डेंग्यूू ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा ‘एडीस एजिप्टाय’ नावाच्या मादी डासामुळे होतो. या डासाच्या पायांवर पांढरे पट्टे असल्याने त्यांना ‘टायगर मॉस्कीटो’ म्हणतात. सदर डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे रांजणातील पाणी, सिमेंटच्या टाक्यातील पाणी, इमारतीवरील टाक्यातील पाणी, घराभोवतालच्या टाकावू वस्तू उदा. प्लास्टीकच्या बादल्या, रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, निरुपयोगी टायर्स इत्यादीमध्ये साठलेले पाणी घरातील कुंड्या, फुलदाण्या, कुलर्स इत्यादीमध्ये साठलेले पाणी यांच्यात होते.
जागतिक आरोग्य दिवशी किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने आरोग्य कर्मचाऱ्यांने प्रभातफेरी काढली. जिल्ह्यातील ३६ जोखमीच्या ग्रामपंचायतीमधील सरपंच व ग्रामसेवक यांची सभा जिल्हास्तरावर आयोजित करून मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडून त्यांनाडेंग्यूबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत शालेय डेंग्यू जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना डेंग्यूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना याचे माहिती देण्यात आली. साथ उद्रक झालेल्या गावामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत रुग्ण सर्व्हेक्षण, डास अळी स्थाने नष्ट करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली. गावामध्ये उपचार शिबिर लावण्यात आले, किटकनाशक धूर फवारणी कर यात आली. १५ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक गावात डेंग्यू विषयी माहिती देण्यात आली. साथ उद्रेक झालेल्या गावामधील ग्रामसेवक व सरपंच यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभा घेऊन त्यांचा नियंत्रण उपाययोजना बाबत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खालीलप्रमाणे २ दिवसीय डेंग्यू आजार प्रतिबंधात्मक कार्यवाही अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य िचकित्सक यांच्या निर्देशानुसार इंडीयन मेडीकल असोसिएशन मधील खागसी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची डेंग्यूबाबत कार्यशाळा घेवून मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी स्वत: परसोडी येथील ग्रामपंचायत व साकोली येथील पंचायत समितीला भेट देवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तुमसर येथे पंचायत समितीला सर्व ग्रामसेवक , सरपंच, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची सभा घेवून प्रत्येक उद्रेकग्रस्त गावांना भेट देवून डेंग्यू प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात २ दिवसीय डास अळी नष्ट करण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर द्वारे डेंगू आजाराबाबत व प्रतिबंधात्मक उपायाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. गणेशोत्सवातून या आजाराबाबत आरोग्य प्रदर्शनी लावून जनजागृती करून आरोग्य शिक्षण देण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत प्रत्येक गावात घरोघरी सर्व्हेक्षण करून डास अळी शोधून काढल्यास सर्वात जास्त डास अळीस्थाने शोधून काढलेल्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे १,२,३ प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षिस योजना राबविण्याचा उपक्रम आरोग्य विभागाने सुरु केला आहे. डेंग्यूबाबत नागरितकांनी दहशत न ठेवता आरोग्य केंद्रातून उपचार करून सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून यासंबंधी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डोईफोडे, यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Protect yourself from viral illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.