जिल्हा परिषदेतील अभियंत्यांची रिक्त पदे तातडीने भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:40+5:302021-08-25T04:39:40+5:30
जिल्हा परिषदेच्या अभियंता संवर्गात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. विशेष बाब म्हणून त्या तातडीने भरण्याची मागणी अनेक वर्षांपासून संघटनेमार्फत ...

जिल्हा परिषदेतील अभियंत्यांची रिक्त पदे तातडीने भरा
जिल्हा परिषदेच्या अभियंता संवर्गात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. विशेष बाब म्हणून त्या तातडीने भरण्याची मागणी अनेक वर्षांपासून संघटनेमार्फत करण्यात येत आहे. शासनाने मेगा नोकर भरती जाहीर केली. मात्र, त्यात केवळ आरोग्य विभागातीलच रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे जिल्हा परिषद अभियंता संवर्गात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यानुषंगाने संघटनेने नुकतीच आमदार डॉ. परिणय फुके यांची भेट घेतली. हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. संघटनेची मागणी लक्षात घेत आमदार फुके यांच्या नेतृत्त्वात संघटनेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन जिल्हा परिषद अभियंत्यांच्या समस्या मार्गी लावण्याची विनंती केली होती. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले. जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गाच्या रिक्त जागा तातडीने भरून जिल्हा परिषदेत एक विद्युत उपविभाग निर्माण करण्यासंदर्भात मागणी केली. त्यादृष्टीने लवकरच मागण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.