लाखांदूर पोलीस ठाण्यातील ७ पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:34 IST2021-07-29T04:34:39+5:302021-07-29T04:34:39+5:30

लाखांदूर : पोलीस प्रशासनांतर्गत गत काही वर्षांपासून पोलीस अंमलदार व नाईकपदावर कार्यरत लाखांदूर पोलीस ठाण्यातील ७ पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती ...

Promotion of 7 police personnel from Lakhandur police station | लाखांदूर पोलीस ठाण्यातील ७ पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती

लाखांदूर पोलीस ठाण्यातील ७ पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती

लाखांदूर : पोलीस प्रशासनांतर्गत गत काही वर्षांपासून पोलीस अंमलदार व नाईकपदावर कार्यरत लाखांदूर पोलीस ठाण्यातील ७ पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. या पदोन्नतीअंतर्गत येथील ४ पोलीस अंमलदारांना पोलीस नाईक तर ३ पोलीस नायकांना हवालदार पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.

स्थानिक लाखांदूर येथील पोलीस ठाण्यांतर्गत तालुक्यातील ४८ गावांत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सेवा दिली जात आहे. या कर्मचाऱ्यांत पोलीस अंमलदार, पोलीस नाईक , पोलीस हवालदार व सहाय्यक फौजदार आदींचा समावेश आहे. शासनाच्या पोलीस प्रशासनाद्वारे काही पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. लाखांदूर पोलीस ठाण्यातील ४ पोलीस अंमलदारांची पोलीस नाईकपदावर पदोन्नती करण्यात आली आहेत. यात संदीप बावणकुळे, संदीप रोकडे, प्रफुल्ल कठाणे व रंजनदास चुटे यांचा समावेश आहे. तर तीन पोलीस नायकांची हवालदारपदावर पदोन्नती झाली आहे. यात विलास मातेरे, प्रदीप राऊत व भैरवी या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस प्रशासनांतर्गत लाखांदूर ठाण्यातील एकूण ७ कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आल्याने लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे, पुंडलिक म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, अमोल कोकाटे, अमरदीप खाडे, विष्णू कराडे यांसह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Web Title: Promotion of 7 police personnel from Lakhandur police station