प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणार

By Admin | Updated: December 15, 2015 00:48 IST2015-12-15T00:48:41+5:302015-12-15T00:48:41+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टी शिवसेना प्रणित युती सरकार शेतकरी, शेतमजूर, ...

Project affected people will get compensation | प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणार

प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणार

भंडारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टी शिवसेना प्रणित युती सरकार शेतकरी, शेतमजूर, कामगार, प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून बावनथडी प्रकल्पाच्या समस्या निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले असता याप्रकरणी लक्ष वेधून आग्रह धरला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनथडी प्रकल्पाच्या विकासासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली.
तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी हा उदात्त हेतू समोर ठेवून बावनथडी प्रकल्प निर्माण करण्यात आले. यासाठी तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या उपजाऊ सुपीक जमिनी संपादित करण्यात आल्यामुळे शेतकरी बांधवांना संपादीत जागेचा मोबदला विहीत कालावधीत देणे ही तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सरकारची नैतिक जबाबदारी होती. तब्बल १५ वर्षापर्यंत एकहाती सत्ता असतानादेखील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी बावनथडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोबदला अदा करण्यास उपेक्षित धोरण स्वीकारले होते.
तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्याच लालफितशाही, तुघलकी धोरणामुळे प्रकल्पबाधीत शेतकरी बांधवांना मोबदला मिळण्यास अतिविलंब झाला. यास तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार जबाबदार होते. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी भरीव निधीची तरतूद केली नव्हती असा आरोपही आ.चरण वाघमारे यांनी केला. शेतकऱ्या्च्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Project affected people will get compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.