खुटसावरी येथे ग्रामीण पाणीपुरवठा अभियंत्यांसमोर मांडल्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST2021-05-21T04:37:49+5:302021-05-21T04:37:49+5:30
खुटसावरी ग्रामपंचायतअंतर्गत इंदिरानगर व पिंपळगाव या गावांचा समावेश आहे. येथील लोकसंख्या १४४१ असून सात विहिरी, दहा बोरवेल आहेत. विहिरीत ...

खुटसावरी येथे ग्रामीण पाणीपुरवठा अभियंत्यांसमोर मांडल्या समस्या
खुटसावरी ग्रामपंचायतअंतर्गत इंदिरानगर व पिंपळगाव या गावांचा समावेश आहे. येथील लोकसंख्या १४४१ असून सात विहिरी, दहा बोरवेल आहेत. विहिरीत सध्या पाण्याचा ठणठणाट आहे. काही बाेरवेल्स नादुरुस्त तर काही बोलवेल्सला अशुद्ध पाणीपुरवठा होतो. गावात एक जलकुंभ, एक सौरऊर्जेचा प्रकल्प आहे. मात्र, गावातील शेवटच्या टोकावर असलेल्या नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गावातील जलकुंभ जीर्ण असल्याने नव्याने बांधकाम व्हावे, इंदिरानगर येथे जलकुंभाची निर्मिती व्हावी, जलवाहिनीची कामे करण्यात यावीत यासह पाणीपुरवठ्याविषयी समस्या मांडण्यात आल्या. अभियंता बघेले यांनी येथील समस्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ग्रामसेवकांना दिले.
यावेळी सरपंच मनीषा वासनिक, सदस्या ज्योती नंदेश्वर, प्रियंका सार्वे, ग्रामसेवक प्रदीप चेटुले, पोलीस पाटील संघदीप भोयर, तलाठी बांबोर्डे, डाटा ऑपरेटर विनोद पोटवार, शिपाई रुस्तम टेंभुर्णे, बाबूलाल वासनिक, सुरेश सार्वे आदी उपस्थित होते.