पॅरोलवर फरार कैदी जेरबंद
By Admin | Updated: May 24, 2014 23:21 IST2014-05-24T23:21:31+5:302014-05-24T23:21:31+5:30
आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटून आल्यानंतर फरार झालेल्या कैद्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. राजकुमार बाबूराव लाडे (३0) रा. सितासावंगी असे आरोपीचे नाव आहे.

पॅरोलवर फरार कैदी जेरबंद
तुमसर : आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटून आल्यानंतर फरार झालेल्या कैद्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. राजकुमार बाबूराव लाडे (३0) रा. सितासावंगी असे आरोपीचे नाव आहे. २0 डिसेंबर २00५ रोजी तुमसर तालुक्यातील बघेडा येथे दुहेरी हत्याकांड घडले होते. अंगणातील झाडांची पाने शेळ्या खात असल्याच्या कारणावरून राजकुमार लाडे याने दिवारु केरवदे व श्यामराव शिवरकर या दोघांवर कुर्हाडीने हल्ला करुन त्यांना जागीच मारले होते. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३0२, ४५२, १४७, १४८ व १४९ कलमान्वये गुन्हे दाखल करून राजकुमार लाडे याला अटक केली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. उच्च न्यायालयानेही आजन्म कारावासाची शिक्षा कायम ठेवली. मागील अनेक वर्षापासून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. दरम्यान खासगी कारणावरून त्याने ६ सप्टेंबर २0१३ रोजी १0 दिवसाचा पॅरोल मिळविला. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर पुन्हा अर्ज करीत पॅरोलचा कालावधी १0 दिवसाने वाढवून घेतला. मुदत संपल्यानंतर कारागृहात हजर होणे आवश्यक असताना तो फरार झाला. याबाबत मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी फरार लाडेविरुद्ध २२४ कलमान्वये गुन्हा दाखल करुन शोध घेताना तो त्याने अनेकवेळा चकमा दिला. दरम्यान २४ मे रोजी त्याचा विवाह असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी २१ मे च्या रात्रीच्या सुामरास त्याला नागपूर जिल्ह्यातील पिपरी येथून अटक केली. पोलीस अधीक्षक कैलास कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, ठाणेदार मनोज वाढीवे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी कामगिरी बजावली. (तालुका प्रतिनिधी)