शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षकांचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 10:15 PM

मागील तीन वर्षात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य केलेल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी शुक्रवारी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनतर्फे जेलभरो आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविजुक्टाचा पुढाकार : शिक्षणमंत्र्यांना पाठविले निवेदन

आॅनलाईन लोकमतभंडारा : मागील तीन वर्षात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य केलेल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी शुक्रवारी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनतर्फे जेलभरो आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन विजुक्टातर्फे जिल्हाधिकाºयांमार्फत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाठविण्यात आले आहे.विजुक्टातर्फे नमुद करण्यात आलेल्या निवेदनात मागील चार ते पाच वर्षांपासून नियुक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना नियुक्ती मान्यता मिळालेली नाही. ज्यांना मान्यता मिळाली परंतु शालार्थ प्रणाली सुरु न केल्यामुळे त्यांना वेतन सुरु झालेले नाही. १ नोव्हेंबर २००५ नुसार नविन अंशदायी पेन्शन योजनेची शिक्षकांच्या वेतनातून १० टक्के कपात केलेल्या रक्कमेचा हिशोब दिलेला नाही. विनाअनुदानावरील शिक्षकांना २०१४ पासून २० टक्के अनुदान देण्याचा आदेश काढला होता. परंतु तीन वर्षांपासून शिक्षकाच्या वेतनात अनुदानाची रक्कम समाविष्ठ नाही. अशा शिक्षकांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची परवानगी दिली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संघटनेतर्फे अनेकदा निवेदने देवूनही संबंधित विभागाच्या अधिनस्थ अधिकाºयांनी मागण्याकडे दुर्लक्ष केले आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये काढण्यात आलेला वरिष्ठ व निवड श्रेणीचा आदेशही अन्यायकारक आहे. केंद्राप्रमाणे शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, सेवानिवृत्ती वय ६० वर्षे करण्यात यावे, सहाव्या वेतन आयोगामधील ग्रेडपेमधील अन्याय दुर करावा २००३ ते २०११ पर्यंतच्या मंजूर वाढीव पदावरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता देवून शालार्थ प्रणाली सुरु करावी, संच मान्यतेतील त्रुटी दुर करुन संच मान्यता प्रदान करावी, शिक्षण सेवक (सहायक शिक्षक) योजना रद्द करावी, एमऐड, एमफील व पीएचडीधारक विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालयाप्रमाणे लाभ व सुविधा द्यावी, रिक्त पदावर शिक्षकांची नियुक्ती करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. मात्र मागण्यांची पुर्तता होत नसल्याने विजुक्टातर्फे शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले. शासनाने मागण्यांची पुर्तता करुन राज्यभरातील १५ लाख विद्यार्थी व ७२ हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनात विजुक्टाचे अध्यक्ष प्रा. मार्तंड गायधने, प्रा. राजेंद्र दोनाडकर, प्रा. ज्ञानेश्वर गोपाले, प्रा. एम. एस. मिसाळकर, एम. बी. झंझाड, एच. ए. बोरकर, सी. एच. देशपांडे, डी.एम. लांडगे, डी. एच. हटवार, एस. एस. गायधने, एच. एल. बैकुंठी, डी. टी. कल्चर, डी. एल. राऊत, ए. एम. देशभ्रतार, जे. डब्ल्यू ईश्वरकर, आर. एच वैरागडे, आर. एस. मोहतुरे आदी उपस्थित होते.